Home ताज्या बातम्या कोरोना अलर्ट : जिल्हयात आज प्राप्त 08 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह ‘

कोरोना अलर्ट : जिल्हयात आज प्राप्त 08 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह ‘

बुलडाणा : जिल्ह्यात आज प्राप्त 08 रिपोर्ट निगेटिव्ह असून आतापर्यंत 681 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 26 रुग्ण कोरोनाबधित होते. त्यापैकी एक मृत आहे. आतापर्यंत 23 कोरोनाबधीत रुग्णांचा तपासणी अहवाल कोरोना निगेटिव्ह आल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे कोविड रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुटी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 23 आहे. सध्या रूग्णालयात दोन रूग्ण कोरोनाबाधीत असून त्याच्यावर उपचार सुरू आहे.

तसेच आज 16 मे रोजी 08 अहवाल प्राप्त झाले आहेत. हे सर्व 08 अहवाल निगेटीव्ह आहेत. तसेच आज रोजी अहवालाच्या प्रतिक्षेत असलेले नमुने 72 आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 681 आहेत, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. आर. जी पुरी यांनी दिली आहे.