दर्शन पोलीस टाइम : परवेज शेख
कोरोना चाचण्यांसाठी खासगी प्रयोगशाळांच्या प्रतिनिधींसोबत चर्चा !
कोरोना चाचणीसाठी आयसीएमआरने मान्यता दिलेल्या खासगी तपासणी प्रयोगशाळांच्या प्रतिनिधींसमवेत आज बैठक घेतली. पुणे शहरात कोरोनाचा प्रसार रोखायचा असल्यास मोठ्या प्रमाणात संशयितांच्या चाचण्या होणे आवश्यक आहे. शासकीय चाचण्यांची संख्या मर्यादित असल्याने खासगी प्रयोगशाळांकडून चाचण्या करून घेण्यासाठी महापालिका तयार आहे. मात्र, सवलतीचे दर द्यावेत, अशी अपेक्षा प्रतिनीधींकडे व्यक्त केली.
शहरात सध्या ११ खासगी तर ४ शासकीय तपासणी प्रयोगशाळा आहेत. त्यांची एकूण तपासणी क्षमता ९ हजार चाचण्यांची आहे. मात्र, महापालिका रुग्णालयांतील रुग्णांची चाचणी फक्त शासकीय रुग्णालयातच केली जाते. त्यांची दरदिवशी क्षमता जवळपास पंधराशे आहे. या प्रयोगशाळांच्या चाचण्यांची क्षमता वाढण्यास आणखी कालावधी लागणार असल्याने आपण खासगी प्रयोगशाळांकडे अपेक्षा व्यक्त केली आहे.
कोरोना चाचणीसाठी सुमारे ४,५०० रूपयांचा खर्च आकारला जात होता. मात्र, शासनाने शनिवारी हा दर २,२०० रूपये निश्चित केला आहे. मात्र, तोदेखील परवडणारा नसल्याने त्यापेक्षा कमी दरात चाचण्या कराव्यात. त्याचा खर्च महापालिका देईल, असा प्रस्ताव आपण प्रयोगशाळांच्या प्रतिनिधींना दिला आहे.
यावेळी महापालिकेचे आरोग्य प्रमुख डॉ. रामचंद्र हंकारे, सहायक आरोग्य प्रमुख डॉ. संजीव वावरे, डॉ. अंजली साबणे यावेळी उपस्थित होत्या.