कोरोना महामारी आपल्या सेवेचे कर्तव्य बजावणाऱ्या व्यक्तींचा राष्ट्रीय ओ.बी.सी.फाउंडेशन तर्फे सन्मान..‌.

- Advertisement -

एरंडोल: राष्ट्रीय ओबीसी फाउंडेशन महाराष्ट्र राज्य शाखा एरंडोल यांच्यातर्फे कोरोना महामार्ग च्या काळात जे व्यक्ती आपली सेवा कर्तव्य करत होते. यात डॉक्टर्स, सफाई कर्मचारी, पोलीस प्रशासन, महसूल प्रशासन, नगरपालिका कर्मचारी, शिक्षक, अशा विविध स्तरातील व्यक्तींचा सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

ओबीसी फाउंडेशन एरंडोल हे नेहमी समाजकारणात स्वतःला वाहून घेत असतात. शैक्षणिक सामाजिक क्षेत्रात अन्यायाविरुद्ध आवाज उठवतात . व सामाजिक सलोख्याचे जाणीव ठेवून फाउंडेशन च्या वतीने हा सन्मान करण्यात आला. विशेष म्हणजे की फाउंडेशनचे पदाधिकारी प्रत्येकाच्या घरी जाऊन. हा सन्मान करण्यात आला. यावेळी फाऊंडेशनचे प्रकाशभाऊ महाले,नितीन महाजन ,कल्पेश देशमुख,योगेश पाटील ,महेश सुतार,रोहीत महाजन ,अमोल चौधरी यांनी सदर कार्यक्रमास मेहनत घेतली.

- Advertisement -