Home गुन्हा कोरोना मुक्तीच्या बंदोबस्तातही माणगांव पोलिसांनी केली गावठी दारू आणि हातभट्यांवर मोठी कारवाई – पोलीसांचे सर्वत्र कौतुक

कोरोना मुक्तीच्या बंदोबस्तातही माणगांव पोलिसांनी केली गावठी दारू आणि हातभट्यांवर मोठी कारवाई – पोलीसांचे सर्वत्र कौतुक

0

बोरघर / माणगांव ( विश्वास गायकवाड ) रायगड जिल्ह्यातील माणगांव पोलीस ठाण्याचे कर्तव्य दक्ष डीवायएसपी श्री. शशिकिरण काशिद आणि कर्तव्य तत्पर पोलीस निरीक्षक श्री. रामदास इंगवले यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक उद्धव सुर्वे, सहाय्यक फौजदार जितेंद्र वाटवे, पोलिस हवालदार स्वप्निल कदम, रवींद्र म्हात्रे, सौ. सुनिता सानप, सौ. दया पाटील, पोलिस ना. सुनील शिरसाठ, पोलिस शिपाई विनायक चांदूरकर, शाम शिंदे, राम डोईफोडे आणि श्रेयस म्हात्रे यांच्या टीमने मोठ्या धाडसाने माणगांव पोलीस ठाणे कार्यक्षेत्रा अंतर्गत सोमवार दिनांक २० एप्रिल आणि मंगळवार दिनांक २१ एप्रिल अर्थात काल आणि आज दोन दिवसात मोर्बा विभागातील साई, विहुले, सुर्ले माणगांव पूर्वेकडील होडगांव, माणगांव लगतच्या नाणोरे आदिवासी वाडी, उत्तेखोल आदिवासी वाडी आणि खांदाड आदिवासी वाडी येथील गावठी दारू आणि हातभट्यांवर धाड टाकून घटनास्थळी सापडलेले गुळ मिश्रित दारू निर्मितीसाठी लागणारे रसायन जागेवर पुर्णपणे नष्ट उध्वस्त केले.

माणगांव तालुक्यातील गावठी दारू आणि हातभट्यांवर माणगांव पोलिस ठाण्याचे कर्तव्य दक्ष उप विभागीय पोलीस अधिकारी तथा डीवायएसपी श्री शशिकिरण काशिद आणि माणगांव पोलीस ठाण्याचे कर्तव्य तत्पर पोलीस निरीक्षक श्री. रामदास इंगवले यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक उध्दव सुर्वे, सहाय्यक फौजदार जितेंद्र वाटवे, पोलीस हवालदार स्वप्निल कदम, रविंद्र म्हात्रे, सौ. सुनिता सानप, सौ. दया पाटील, पोना सुनिल शिरसाठ, पोशि विनायक चांदूरकर, शाम शिंदे, राम डोईफोडे आणि श्रेयश म्हात्रे यांच्या टीमने गावठी हातभट्टी दारुचे अड्डयावर धाड टाकून तेथे मिळून आलेले गुळ मिश्रित रसायन जागीच नष्ट केल्यामुळे त्यांच्या या धाडसी कामगिरीचे संपूर्ण माणगांव तालुक्यातून कौतुक केले जात आहे.

सध्या कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी सरकारने संचारबंदी व लाॅकडाऊनचे आदेश संबंधित सरकारी यंत्रणा आणि पोलीस प्रशासनाला दिले आहेत. त्यामुळे पोलीसांच्या दैनंदिन कामकाजावर प्रचंड ताण निर्माण झाला आहे. पोलीसांना आपल्या दैनंदिन कामकाजा बरोबर कोरोना मुक्ती च्या या राष्ट्रीय लढ्या साठी अाहे कौटुंबिक जीवन बाजूला ठेवून अहोरात्र ड्यूटी करावी लागत आहे. कोरोना विषाणू मुक्तीच्या पार्श्वभूमीवर देशात सर्वत्र सुरू असलेल्या लाॅकडाऊन संचारबंदी मुळे सद्या सर्वत्र सर्व प्रकारची देशी विदेशी दारु दुकाने आणि बिअर बार बंद असल्याने तळीरामांचे आणि गावठी दारू निर्मिती करणाऱ्यांच्या वेगवेगळे प्रताप सुरू झाले आहेत. तसेच लाॅकडाऊन मुळे मोठ्या प्रमाणात नागरीक मुंबई व उपनगरातून आपापल्या गावी आले आहेत. त्यामुळे गावठी हातभट्टी दारुचे अड्डे विविध गावात चालू असल्याचे माहितीवरुन काही ठिकाणी तेथील स्थानिक पोलीस पाटील यांचे मदतीने वरील सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी कोरोना मुक्तीच्या पार्श्वभूमीवर चोख पोलीस बंदोबस्त असून सुद्धा आपल्या कर्तव्यात कुठेही कसर न करता पोलीस बंदोबस्त सांभाळून संबंधित गावठी दारू निर्मिती आणि हातभट्यांवर त्या त्या ठिकाणी मोठ्या शिताफीने धाड टाकून चांगली कामगिरी केली आहे. व पुढेही अशीच कारवाई चालू राहील. असे माणगांव पोलीस ठाण्याचे कर्तव्य दक्ष डीवायएसपी श्री. शशिकिरण काशिद आणि पोलीस निरीक्षक श्री. रामदास इंगवले यांनी म्हटले आहे.