पारोळा प्रतिनिधी
जळगांव जिल्ह्यातील पारोळा शहराचे लोकनियुक्त नगराध्यक्ष श्री कारण पवार यांनी सर्व प्रकारातील व्यापारी वर्ग व तसेच भाजीपाला विक्रेते व उद्योजकांचा सोबत बैठक घेऊन कोरोना संकटावर मात करत बाजारपेठ व तालुक्यातील आर्थिक मंदीचे सावट कमी करण्यासाठी तसेच नागरिकांना दैनंदिन वस्तू सुलभपणे मिळण्याकरिता पारोळा शहरातील बाजारपेठ सुरू करण्याच्या अनुषंगाने व्यापाऱ्यांन सोबत बैठक घेण्यात आली. या बैठकीत सर्वांसोबत चर्चा करून बाजारपेठ दररोज सकाळी ८ ते ३ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय करण्यात आला. व तसेच आठवड्यातील एक ते दोन दिवस पूर्णतः बाजारपेठ बंद ठेवण्यात येणार आहे.
आज रोजी:-
आज व्यापारी असोसिएशन, नगराध्यक्ष नगरसेवक यांच्यातर्फे शहरातील भाजीपाला विक्रेते कापड विक्रेता मेडिकल, हार्डवेअर दुकानदार, पेपर वाटप करणारे यांच्यासाठी सेणी टायझर, मास्क,मोठ्या प्रमाणात देण्यात आले आहे.

दुकानावर विना मास लावलेले ग्राहक आल्यास त्याला सुध्दा मास्क देण्यात याव्यात अशा सूचना देण्यात आल्या.विशेष करून भाजीपाला विक्रेत्यांसाठी हॅन्ड ग्लोज चे वाटप करण्यात आले.

नगराध्यक्ष, नगरसेवकांच्या आवाहनास व्यापारी वर्गाचा प्रतिसाद दुपारी 3 नंतर बाजारात शुकशुकाट. नगराध्यक्ष स्वतः फिरून दुकाने बंद करण्यास आवाहन करत. त्या वेळी व्यापारी व किरकोळ विक्रेत्यांकडून देखील नगराध्यक्ष यांना पूर्ण पणे आवाहनास सहमतीने बाजारपेठ 100% लॉकडाऊन चे पालन करत बंद करण्यात आले. यामुळे शहरातील तसेच ग्रामीण भागातील नागरिकांना दैनंदिन लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तू सहज उपलब्ध होत असल्याने , यामुळे बाजारात होत असलेली गर्दी व सोशल डिस्टन्स चा फज्जा उडत नाही. आर्थिक व्यवहार देखील सर्वांचे सुरळीत होतात.

करण पवार हे होतकरू तरुण तडफदार युवा नेता असल्याने,तरुण पिढीचे आदर्श लोकनियुक्त नगराध्यक्ष आहे. त्यांनी व्यापाऱ्याचे व सामान्य नागरिकांचे हीच जाणत घेतलेल्या निर्णयाचे व्यापारी वर्ग तसेच शहरवासीय यांकडून त्यांच्या निर्णयाचा आदर करत स्वागत करीत आहे.

यावेळी आरोग्य सभापती दीपक अनुष्ठान, नगरसेवक पी जी पाटील , प्रकाशबापू शिरोळे,भैय्या चौधरी,प्रकाश महाजन,गौरव बडगुजर, अमोल चौधरी,धीरज महाजन,कैलास पाटील,तसेच, केशवशेठ क्षत्रिय,विलास वाणी,बंडू नाना,अशोक ललवाणी यांचा सह पत्रकार रावसाहेब भोसले सर, आनुपभाई फंड, योगेश अण्णा पाटील, रमेश कुमार जैन, संजय पाटील, दीपक भावसार हे उपस्थित होते.