Home ताज्या बातम्या कोरोना संकटात पार पडला अनोखा विवाह सोहळा हडपसरच्या पोलीस अधिकाऱ्याने केले कन्यादान लॉकडाउनमुळे वधू-वराचे पालक गैरहजर

कोरोना संकटात पार पडला अनोखा विवाह सोहळा हडपसरच्या पोलीस अधिकाऱ्याने केले कन्यादान लॉकडाउनमुळे वधू-वराचे पालक गैरहजर

0

कोरोना संकटात पार पडला अनोखा विवाह सोहळा
हडपसरच्या पोलीस अधिकाऱ्याने केले कन्यादान
लॉकडाउनमुळे वधू-वराचे पालक गैरहजर

पुणे : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात लॉकडालाईन सुरू आहे. मात्र काहींचे पूर्वनियोजित लग्न ठरले होते. कोरोना व लग्नाचा सुवर्ण दिन यांची आठवण कायम मनी राहण्यासाठी पुण्यातील तरुण-तरुणीने ठरलेल्या मूहुर्तावर लग्न करायचे ठरवले. मात्र लॉकडाउनमुळे वधू-वराचे पालक लग्नाला हजर राहू शकले नाही आणि हडपसर पोलिसांनी कन्यादान केले. 
 पुणे शहरात राहणारे आयटी अभियंता आदित्यसिंग बिष्ट आणि डॉक्टर नेहा कुशवाह यांचे रविवार २ मे रोजी लग्न करयाचे ठरले होते. मात्र कोरोना संकटात लॉकडाउनमुळे आदित्यसिंगचे वडील देवेंद्र सिंह हे सैन्यात कर्नल असून, ते सध्या देहरादून येथे कर्तव्य बजावत आहेत तर मुलीचे वडील अरविंदसिंग कुशवाह हेदेखील सैन्यात डॉक्टर असून उपराजधानी नागपुरातील आर्मी मेडिकल कॉलेजमध्ये प्राचार्य आहेत. 

नेहा आणि आदित्य यांचा फेब्रुवारी महिन्यात साखरपुडा झाला होता. २ मे रोजी निश्चित केल्यानुसार त्याच दिवशी लग्न करण्याचा दोघांनी निश्चय घेतला. जबाबदारी नागरिक या नात्याने दोघांच्या पालकांनी लग्नाला हजर न राहण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, नेहा आणि आदित्य यांच्या पालकांनी स्थानिक पोलिसांना सर्व हकीगत सांगितली. नेहाचे कन्यादान करण्याची विनंती केली. देशसेवा करणाऱ्या सैन्य अधिकाऱ्यांच्या विनंतीचा मान्य ठेवून हडपसर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रसाद लोणारी यांनी विवाह सोहळ्याची तयारी केली. सोशल डिस्टन्सचे पालन करून नेहाचे कन्यादान केले. कोरोना संकटात राज्य पोलीस दलातील अनेकांनी सामाजिक व शासकीय अशी दुहेरी कर्तव्ये बजावली आहेत.
कोरोना संकट झालेला विवाह कायम स्मरणी राहील, असे मत आनंद व्यक्त करताना नव वर-वधू नेहा आणि आदित्य यांच्यासह हडपसर पोलिसांनी व्यक्त केला. जेव्हा जेव्हा कोरोना संकटाचा विषय निघेल त्यावेळी आवश्य या अनोख्या विवाह सोहळा हमखास आठवण केली जाईल.

pune_police

corona

wedding_ceremony