Home शहरे कोल्हापूर कोल्हापुरातील जमावबंदीचा आदेश रद्द, सर्वच स्तरातून विरोध झाल्याने प्रशासनाचा निर्णय

कोल्हापुरातील जमावबंदीचा आदेश रद्द, सर्वच स्तरातून विरोध झाल्याने प्रशासनाचा निर्णय

0

कोल्हापूर : अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी 12 ते 24 ऑगस्ट रात्री 12 वाजेपर्यंत जमाव बंदी आदेश जारी करण्यात आले होते. मात्र बंदीच्या आदेशावर चोहोबाजूने टीका झाली. यानंतर सरकारने एका दिवसातच हा जमावबंदीचा आदेश रद्द केला आहे.

कोल्हापूर पोलीस अधिक्षकांनी हा अदेश जारी केला होता. 12 ते 24 ऑगस्टपर्यंत ही जमावबंदी लागू करण्यात आली होती. मात्र या आदेशावर सर्वच विरोधी पक्षांकडून टीका करण्यात आली. अखेर सोमवारी रात्रीच अपर जिल्हा दंडाधिकारी संजय शिंदे यांनी बंदीचा आदेश रद्द करण्याचे पत्रक जारी केले आहे.

गेल्या पंधरा दिवसांपासून कोल्हापुरात पूराने थैमान घातले आहे. जिल्ह्यातील नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. सर्वांचे संसार वाहून गेले आहेत. यातून पूरगस्त व नागरिक यांच्याकडून जीवनाश्यक वस्तूंसाठी धडपड केली जात आहे. दरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवण्याची भीतीमुळे महाराष्ट्र पोलिस अधिनियम, 1951 चे कलम 37(1) अ ते फ आणि कलम 37 (3) अन्वये कोल्हापूर जिल्ह्यात 24 ऑगस्टपर्यंत बंदी आदेश जारी करण्यात आला होता. मात्र चौफेर टीका झाल्यानंतर हे आदेश रद्द करण्यात आले आहेत.