Home शहरे अकोला कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर – महासंवाद

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर – महासंवाद

0
कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर – महासंवाद

कोल्हापूर, दि.12 (जिमाका): कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणूकीचा कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. 12 एप्रिल रोजी मतदान होणार असून 16 एप्रिल रोजी मतमोजणी होऊन निकाल घोषित करण्यात येणार आहे. या मतदार संघात आचारसंहितेची कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे. 

            कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघाचे तत्कालीन आमदार चंद्रकांत जाधव यांच्या अकाली निधनामुळे या मतदारसंघाची जागा रिक्त झाली होती

आज केंद्रीय निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे.

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघासाठी निवडणुकीची अधिसूचना- 17 मार्चला जाहीर होणार आहे.

अर्ज भरण्याची मुदत-दि. 17 मार्च ते 24 मार्च 2022 आहे.

अर्जांची छाननी- 25 मार्च रोजी करण्यात येणार आहे.

उमेदवारी अर्ज माघार घेण्याची अंतिम तारीख- 28 मार्च आहे.

पोटनिवडणुकीसाठी मतदान- 12 एप्रिल रोजी होणार आहे.

मतमोजणी- 16 एप्रिल रोजी होणार आहे.

276 -कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यामुळे मतदार संघ क्षेत्रामध्ये आजपासून आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.