Home शहरे मुंबई कोविडव्यतिरिक्त रुग्णांनाही मिळावे उपचार!

कोविडव्यतिरिक्त रुग्णांनाही मिळावे उपचार!

0
कोविडव्यतिरिक्त रुग्णांनाही मिळावे उपचार!

[ad_1]

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

करोना काळात रुग्णालयातील डॉक्टरांपासून परिचारिकांपर्यंत सगळे जण रुग्णांना बरे करण्यासाठी जीवाचे रान करीत आहेत. पण, त्याचवेळी काही रुग्णालये जी नॉनकोविड आहेत, तेथे कोविडशिवाय इतर उपचारांसाठी येणाऱ्या अनेक रुग्णांना मात्र चांगला अनुभव येत नसल्याचा आरोप मनसेने केला आहे. सध्या संपूर्ण आरोग्य यंत्रणेवर अतिरिक्त ताण आहे. पण अशा परिस्थितीत नॉनकोविड रुग्णालयांमध्ये इतर आजारांच्या तक्रारी घेऊन येणाऱ्या रुग्णांशी सौजन्याने वागून त्यांच्या आरोग्यविषयक तक्रारी दूर करण्यासाठी आवश्यक सहकार्य करण्याचे आवाहन करणारे पत्र मनसेने अनेक रुग्णालयांना पाठवले आहे.

कोविडव्यतिरिक्त इतर आजार असलेल्या एका रुग्णाला मुलुंडमधील खासगी रुग्णालयात दाखल करुन घेण्यात आले नाही. वेळेत उपचार न मिळू शकल्यामुळे या रुग्णाला प्राण गमवावे लागल्याचा गंभीर आरोप मनसेचे उपाध्यक्ष सत्यवान दळवी यांनी केला आहे. अनेक नॉनकोविड रुग्णांना रुग्णालयाच्या आवारात घेण्यास टाळाटाळ केली जाते. ‘आधी आरटीपीसीआर टेस्ट करा मगच या’ अशी उत्तरे दिली जातात. यामुळे इतर आजार असलेल्या रुग्णांना कठीण परिस्थितीला तोंड द्यावे लागत आहे. आरोग्य कर्मचारी आज देवदूत बनून काम करीत आहेत. त्यांच्यावर असलेल्या ताणाची सगळ्यांनाच कल्पना आहे. पण नॉन कोविड रुग्णालयांनीही इतर रुग्णांच्या उपचारांकडे दुर्लक्ष करू नये. एखाद्या रुग्णाला करोना संसर्गाची लक्षणे असतील, तर एखाद्या खोलीत तात्पुरती आयसोलेशनची व्यवस्था करावी. पण निदान रुग्णांना प्राथमिक उपचार द्यावेत, अशी अपेक्षा आम्ही रुग्णालयांना पाठवलेल्या पत्रात केली असल्याचे दळवी यांनी स्पष्ट केले.

[ad_2]

Source link