Home ताज्या बातम्या कोवीड तपासणीसाठी येणाऱ्यांना विभागीय आयुक्त .म्हैसेकर यांचे आवाहन

कोवीड तपासणीसाठी येणाऱ्यांना विभागीय आयुक्त .म्हैसेकर यांचे आवाहन

पुणे, दि. 1: कोविड तपासणीसाठी येणाऱ्या नागरिकांनी सोबत आवाश्यक साहित्य आवर्जून आणावे असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी केले आहे.
डॉ. म्हैसेकर पुढे म्हणतात, रुग्णालयात येणाऱ्यां व्यक्तींच्या घशामधील किंवा नाकामधील द्रव्यांचा नमुना तपासणी करीता घेण्यात येते. तपासणीसाठी येतांना मास्क परिधान करणे बंधनकारक आहे. मास्क न घालता या केद्रांचा जवळपास फिरु नये. तपासणी दरम्यान तपासणीसाठी येणाऱ्या व्यक्तींकरीता केंद्रामध्ये ट्रीपल लेअर मास्क ठेवण्यात आले असून त्या मास्कचा वापर करणे आवश्यक आहे.
तपासणी केंद्रावर येतांना किमान दोन दिवसाचे मुक्कामाचे साहित्य सोबत आणावे. त्याबरोबर स्वत:चे कपडे, तसेच आवश्यकतेनुसार पांघरण्यासाठी आणि आंथरण्यासाठी चादर किंवा शाल सोबत घेऊन यावे
ज्या व्यक्तीला मधुमेह, रक्तदाब यासारखे आजार असेल त्यांनी किमान दोन दिवस पुरेल इतके औषधे सोबत आणावे. आवश्यक त्या प्रसंगी संपर्क साधता येईल, त्या व्यक्तीचे नाव व भ्रमणध्वनी बरोबर ठेवावे. मोबाईल वापरत असाल तर त्यांचा चार्जर सोबत घेवून यावे. या सर्व वस्तू सोबत आणत असाल तर वस्तू सांभाळण्याची जबाबदारी ज्यांची त्यांची राहील. आपल्याकडे जर स्मार्टफोन असेल तर केंद्राच्या आरोग्य विभागाचे आरोग्य सेतू ॲप डॉऊनलोड करावे, असे आवाहनही श्री म्हैसेकर यांनी केले आहे.