Home ताज्या बातम्या कोव्हीड बाधित रूग्णांसाठी होरायझन हॉस्पीटलसोबत कौशल्या हॉस्पीटलचा पर्याय उपलब्ध

कोव्हीड बाधित रूग्णांसाठी होरायझन हॉस्पीटलसोबत कौशल्या हॉस्पीटलचा पर्याय उपलब्ध

0

ठाणे: ठाणे शहरातील कोव्हीड बाधित रूग्णांनी आवश्यक वैद्यकिय सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ठाणे महापालिका विविध उपाययोजनांची अंमलबजावणी करीत असून आता कोव्हीड रूग्णांना होरायझन या खासगी रूग्णालयासोबतच कौशल्या हॉस्पीटलचाही पर्याय उपलब्ध करून देण्यात आला असल्याचे महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी स्पष्ट केले आहे.

कोव्हीड बाधित रूग्णांवर उपचार करण्यासाठी महापालिका आयुक्त श्री. सिंघल यांनी यापूर्वीच ठाणे जिल्हा सामान्य या सरकारी रूग्णालयाबरोबरच घोडबंदर येथील होरायझन प्राईम हे खासगी रूग्णालय कोव्हीड रूग्णालय म्हणून घोषित केले होते.

तथापि कोव्हीड रूग्णांची संख्या लक्षात घेवून या दोन रूग्णालयाबरोबरच आता कौशल्या हॉस्पीटलही आता कोव्हीड रूग्णालय म्हणून घोषित करण्यात आले असून त्या ठिकाणी कोव्हीडसाठी आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.