Home ताज्या बातम्या कोव्हीड – 19 वरील उपचारांप्रमाणेच इतर आजारांच्या उपचारांचीही महानगरपालिका घेतेय काळजी

कोव्हीड – 19 वरील उपचारांप्रमाणेच इतर आजारांच्या उपचारांचीही महानगरपालिका घेतेय काळजी

0

     कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना करतानाच कोरोना व्यतिरिक्त इतर आजारांवरील उपचाराची सुविधाही नागरिकांना सहजपणे उपलब्ध व्हावी याकडे महापालिका आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांनी विशेष लक्ष देत तशा प्रकारचे नियोजन केले आहे व त्याकरिता खाजगी रूग्णालय व्यवस्थापनांशी चर्चा करीत नागरिकांची वैद्यकीय उपचार मिळण्याकरिता कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही याची काळजी घेण्याचे निर्देश दिले आहेत. 

27 “फ्ल्यू क्लिनिक”

      कोव्हीड – 19 च्या प्रतिबंधासाठी नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने त्रिस्तरीय आरोग्य सुविधांचे नियोजन करण्यात आले असून महानगरपालिकेची 4 रुग्णालये आणि सर्व 23 नागरी आरोग्य केंद्रे याठिकाणी स्वतंत्र “फ्ल्यू क्लिनिक” स्थापन करण्यात आली आहेत. जेणेकरून ताप, सर्दी, घशात खवखव, श्वासोच्छवासास त्रास अशी लक्षणे असणा-या नागरिकांना घराजवळ तपासणी करून घेता येईल व वैद्यकीय सल्ला मिळेल. तसेच कोव्हिड सदृष्य लक्षणे असल्यास तात्काळ स्वॅब टेस्टींग करता येईल.

2 “कोव्हीड केअर सेंटर (CCC)”

      याप्रमाणेच 2 ठिकाणी”कोव्हीड केअर सेंटर (CCC)” स्थापीत करण्यात आली असून प्रत्येक सेंटरमध्ये 2 स्वतंत्र कक्ष स्थापीत करण्यात आले आहेत. याठिकाणी दोन स्वतंत्र कक्ष निर्माण करण्यात आले असून – एका स्वतंत्र कक्षात स्वॅब सॅम्पल टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेल्या व सौम्य स्वरुपाची लक्षणे असलेल्या कोव्हिड – 19 बाधीतांवर स्वतंत्रपणे उपचार करण्यात येत आहेत व दुस-या स्वतंत्र कक्षात कोरोना पॉझिटिव्ह नागरिकाच्या संपर्कात आल्यामुळे क्वारंटाईन केलेल्या नागरिकांना ठेवण्यात येत आहे. सदर कोव्हिड केअर सेंटर (CCC) पुढील ठिकाणी स्थापीत आहेत.

      (1) बहुउद्देशीय इमारत, सेक्टर 14, वाशी (134 बेड्स क्षमता),

      (2) इंडिया बुल्स, कोनसावळे, पनवेल (1000 बेड्स क्षमता),

3 डेडिकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर (DCHC)

      कोरोनाची मध्यम स्वरुपाची लक्षणे आढळणाऱ्या कोव्हिड -19 बाधीत रुग्णांवर उपचार करण्याकरिता चार डेडिकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर (DCHC) स्थापीत करण्यात आले आहेत.

      (1) हिरानंदानी फोर्टीज हॉस्पिटल, सेक्टर 10, वाशी (46 बेड्स क्षमता),

      (2) डॉ. डी. वाय. पाटील रूग्णालय ( ई विंग), सेक्टर 5, नेरूळ. (100 बेड्स क्षमता),

      (3) रिलायन्स हॉस्पिटल, ठाणे बेलापूर मार्ग, कोपरखैरणे. (50 बेड्स क्षमता)

डेडिकेटेड कोव्हिड हॉस्पिटल” (DCH)

      कोरोनाची गंभीर स्वरुपातील लक्षणे असलेल्या कोव्हिड – 19 बाधीत रुग्णांवर नवी मुंबई महानगरपालिकेच्या वाशी येथील सार्वजनिक रुग्णालयात स्थापीत “डेडिकेटेड कोव्हिड हॉस्पिटल” (DCH) मध्ये (120 बेड्स क्षमता) उपचार केले जात आहेत.

      कोव्हीड – 19 बाधीतांवर उपचाराकरीता अशाप्रकारे त्रिस्तरीय रुग्णालय सुविधांचे नियोजन करताना इतर आजारांच्या रुग्णांनाही सहजपणे वैद्यकीय सुविधा उपलब्ध व्हावी याकडेही विशेष लक्ष देत महापालिका आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांनी खाजगी रुग्णालयांची बैठक घेऊन त्यांना कोव्हीड – 19बाधीत रुग्णवगळता इतर रुग्णांवर उपचार करण्याचे निर्देशित केले आहे. त्यानुसार नवी मुंबईकर नागरिकांना कोव्हीड व्यतिरिक्त उपचारांकरिता खालील रुग्णालये उपलब्ध आहेत.

कोव्हीड – 19 व्यतिरिक्त इतर आजारांवरील उपचारांकरिता उपलब्ध रूग्णालये

(1) महानगरपालिका रूग्णालय – राजमाता जिजाऊ रूग्णालय, सेक्टर 3, ऐरोली. (दूरध्वनी – 27799880)

(2) महानगरपालिका रूग्णालय – माँसाहेब मिनाताई ठाकरे रूग्णालय, सेक्टर 15, नेरूळ (दूरध्वनी – 27700376)

(3) महानगरपालिका रूग्णालय – माता बाल रूग्णालय, बेलापूरगांव. (दूरध्वनी – 27577091)

(4) महानगरपालिकेशी संलग्न खाजगी रूग्णालय – डॉ. डी. वाय. पाटील रूग्णालय, सेक्टर 7, नेरूळ (दूरध्वनी – 27735901)

(5) खाजगी रूग्णालय – एम.जी.एम. हॉस्पिटल, सेक्टर 3, वाशी. (दूरध्वनी – 50666777)

(6) खाजगी रूग्णालय – अपोलो हॉस्पिटल, सेक्टर 23, सी.बी.डी. बेलापूर (दूरध्वनी – 62806280)

(7) खाजगी रूग्णालय – तेरणा हॉस्पिटल, सेक्टर 22, नेरुळ (दूरध्वनी – 61578300)

(8) खाजगी रूग्णालय – रिलायन्स हॉस्पिटल, एम.आय.डी.सी., कोपरखैरणे. (दूरध्वनी – 39666666/39222222)

(9) खाजगी रूग्णालय – साई स्नेहदीप हॉस्पिटल, सेक्टर 20, कोपरखैरणे. (दूरध्वनी – 9619169203)

(10) खाजगी रूग्णालय – एम.पी.सी.टी. हॉस्पिटल, सेक्टर 04, सानपाडा (दूरध्वनी – 27750000)

(11) खाजगी रूग्णालय – मंगल प्रभू नर्सिंग होम, सेक्टर 24, जुईनगर, नेरूळ. (दूरध्वनी – 8108199861)

(12) खाजगी रूग्णालय – माथाडी हॉस्पिटल, सेक्टर 3, कोपरखैरणे (दूरध्वनी – 27541266/27552000)

(13) खाजगी रुग्णालय – न्युरोजेन बी.एस.आय. स्टेन एशिया हॉस्पिटल, सेक्टर 40 नेरूळ(दूरध्वनी – 9920200400)

(14) खाजगी रुग्णालय – इंद्रावती हॉस्पिटल, सेक्टर 3, ऐरोली (दूरध्वनी – 61617777)

(15) खाजगी रुग्णालय – पी.के.सी. हॉस्पिटल, सेक्टर 15 ए, वाशी (दूरध्वनी – 62750100)

(16) खाजगी रुग्णालय – कमलेश मदर अँड चाईल्ड हॉस्पिटल, सेक्टर 8, नेरूळ.(दूरध्वनी – 27726237/27726878)

(17) खाजगी रुग्णालय – सुरज हॉस्पिटल, सेक्टर 15, सानपाडा (दूरध्वनी – 1800220705)

(18) खाजगी रुग्णालय – लायन्स सर्वीस सेंटर हॉस्पिटल, सेक्टर 7, कोपरखैरणे (दूरध्वनी – 27544012)

(19) खाजगी रुग्णालय – एम.जी.एम.हॉस्पिटल, सेक्टर 1ए, सी.बी.डी. बेलापूर (दूरध्वनी –27576703 /27581060)

(20) खाजगी रुग्णालय – सुश्रुषा हार्ट केअर सेंटर ॲण्ड हॉस्पिटल, सेक्टर 6, नेरुळ (दूरध्वनी – 27700273)

(21) खाजगी रुग्णालय – ग्लोबल 5 हेल्थ केअर हॉस्पिटल, सेक्टर 9, वाशी (दूरध्वनी – 27898287)

(22) खाजगी रुग्णालय – आचार्य श्री नानेश हॉस्पिटल, सेक्टर 8 ए, सी.बी.डी. बेलापूर (दूरध्वनी – 08048070888)

(23) खाजगी रुग्णालय – न्यु मिलेनिअम मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, सेक्टर 5, सानपाडा (दूरध्वनी – 9152178752)

(24) खाजगी रूग्णालय – डिव्हाईन मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, से. 6, घणसोली. (दूरध्वनी – 27601418)
Devine multispeciality hospital ghansoli contact number – Google Search

(25) तसेच नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील इतर सर्व रूग्णालये.

      वरील रुग्णालयांप्रमाणेच नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील इतरही 100 हून अधिक रुग्णालयांमध्ये नागरिकांना कोव्हीड – 19 व्यतिरिक्त इतर आजारांसाठी उपचार घेता येतील. तशा प्रकारचे आदेश महापालिका आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांच्यामार्फत खाजगी रुग्णालयांना निर्गमित करण्यात आले आहेत.      तरी खाजगी रूग्णालयांनी आपल्या रूग्णालयात रूग्णसेवेसाठी उपलब्ध असलेल्या बेड्सची संख्या दररोज महानगरपालिकेस कळवावी व कोणताही नागरिक वैद्यकीय सेवेपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश महापालिका आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांनी रूग्णालय व्यवस्थापनांना दिले आहेत.