हायलाइट्स:
- पॉर्नोग्राफी प्रकरणी मुंबई क्राईम ब्रँचकडून राज आणि उमेश कामतची सखोल चौकशी
- राज कुंद्राच्या घरी पोलिसांचा छापा, सर्व्हर आणि ७० पॉर्न व्हिडिओ केले जप्त
- राज हाच पोर्नोग्राफी प्रकरणात मास्टर माईंड असल्याची आयटी हेड रायनची पोलिसांना माहिती
क्राईम ब्रान्चमधील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हे सर्व व्हिडिओ वेगवेगळ्या प्रॉडक्शन हाऊसच्या मदतीने बनवण्यात आले होते. त्याशिवाय हॉट शॉट अॅपवर अपलोड केलेल २० ते ३० मिनिटांचे सुमारे ९० व्हिडिओ देखील पोलिसांच्या हाती लागले आहेत. मुंबई गुन्हे शाखेने राजची चौकशी केली असता या व्हिडिओबद्दल त्याने माहिती दिली. हे व्हिडिओ उमेश कामतने युकेमधील प्रॉडक्शन कंपनी केनरिनला पाठवले होते.
पोलिसांनी सर्वर जप्त केले असून ते फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवले आहे. त्यातून केनरिनसाठी पॉर्नोग्राफी मटेरिअल अपलोड केले जात होते की नाही हे समजू शकणार आहे. दरम्यान, आपण पॉर्न व्हिडिओ नाही तर अन्य ओटीटी प्लॅटफॉर्मवर येणाऱ्या इरॉटिक व्हिडिओप्रमाणेच व्हिडिओ तयार करत असल्याचा दावा राज कुंद्रा सातत्याने त्याच्या चौकशीत करत आहे.
दरम्यान, राज कुंद्राचा साथीदार आणि आयटी हेड रायन थार्प याने पॉर्न व्हिडिओ तयार करत असल्याचे मान्य केले आहे. तसेच या पूर्ण रॅकेटचा सूत्रधार कुंद्राच असल्याचेही त्याने सांगितले आहे. तसेच रायनचं काम केवळ कोणत्या तांत्रिक गोष्टींची काळजी घेत, कायद्यापासून पळवाट काढता येआल हे सांगायचे होते.
पोलिसांनी राज कुंद्राचे वियान इंडस्ट्रीज लिमिटेड आणि एलजी स्ट्रीमिंग या दोन्ही कार्यालयांवर पोलिसांनी छापे घातले आहेत. पोलिसांच्या मते या प्रकरणातील आरोपींनी नवोदित मॉडेल, अभिनेत्री आणि अन्य मुलींच्या असहाय्य स्थितीचा फायदा घेत त्यांन अश्लिल सिनेमांमध्ये काम करण्यास भाग पाडले. हे सर्व चित्रीकरण मुंबईत बंगले भाड्याने घेऊन केले जायचे.