Home बातम्या ऐतिहासिक क्रीडा संकुल अद्ययावतीकरणाच्या कामास गती द्या- क्रीडामंत्री सुनील केदार – महासंवाद

क्रीडा संकुल अद्ययावतीकरणाच्या कामास गती द्या- क्रीडामंत्री सुनील केदार – महासंवाद

0
क्रीडा संकुल अद्ययावतीकरणाच्या कामास गती द्या- क्रीडामंत्री सुनील केदार – महासंवाद

नागपूर, दि.12: बालेवाडी क्रीडा संकुलाप्रमाणे मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुल अद्ययावतीकरणाचे काम चालू असून या कामास गती द्यावी, अशा सूचना क्रीडा मंत्री सुनील केदार यांनी दिल्या.

विभागीय क्रीडा संकुलाच्या अद्ययावतीकरणाबाबत आढावा श्री. केदार यांनी घेतला, त्यावेळी ते बोलत होते. उपसंचालक शेखर पाटील , जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड, आर्किटेक्चर श्री. भिसे, एनसीसीचे अधिकारी तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.

मुंबईच्या धर्तीवर शॉपिंग कॉम्प्लेक्स तयार करा, स्क्वाश खेळासाठी विशेष भर देऊन नागपूरात या खेळाला खेळाडूंकडून जास्तीत जास्‍त प्रतिसाद कसा प्राप्त होईल यासाठी प्रयत्नशिल असल्याचे श्री.केदार म्हणाले.

शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या बांधकामाच्या बदल्यात क्रीडा विभागाची 21 एकर जागा कंत्राटदारांना 30 वर्षासाठी लिजवर दिल्यास काम गतीने होईल, निधीचा प्रश्न संपुष्टात येईल व 30 वर्षानंतर ती जागा पुन्हा शासनास वापरासाठी मिळेल, असे उपसंचालकांनी  सांगितले असता याबाबत विचार करुन नंतरच त्यास मान्यता देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

येत्या 31 डिसेंबर 2023 पर्यंत मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुलाच्या अद्यावतीकरणाचे काम पूर्ण होईल यानूसार नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. कामाचा आराखडा लवकरात लवकर तयार करुन कामास सुरुवात करा. बांधकामात स्पोर्टस कल्बचा समावेश करा. काही तांत्रिक अडचणी आल्यास स्वतंत्र शासन निर्णय काढण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. संकुलातील वॉशरुम पंचतारकित हॉटेल्सप्रमाणे करा. सांडपाणी व्यवस्थापन योग्य करा. जेणेकरुन संकुल परिसरात अस्वच्छता राहणार नाही याची दक्षता घ्या, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

कमर्शियल कॉम्प्लेक्स, फुटबॉलसाठी ओपन स्टेडियम व पहिल्या मजल्यावर हॉकी मैदान या संकुलात राहणार आहेत. खेळाडूंसाठी दोन वसतिगृह बांधण्यात येणार आहे, असे क्रीडा संचालकांनी सांगितले.

नागपूर शहरात लवकरच एरो मॉडेलिंग शो मानकापूर विभागीय क्रीडा संकुल येथे होणार आहे. त्यासंदर्भात बैठक घेण्यात आली. यावेळी हॉर्स रायडिंग, सांस्कृतिक कार्यक्रमाबाबत चर्चा करण्यात आली. ऐरोमॉडेलिंग शो मध्ये 29 ऐॅरोमाडल  व 20 होर्स रायडर यांचा सहभाग राहणार आहे. या शोसाठी 1 हजार 200 खेळाडू परराज्य व देशाबाहेरुन येणार आहेत.  यासाठी 5 हजार विद्यार्थ्यांसाठी आसनाची व्यवस्था करण्यात येणार आहे.  या शोच्या यशस्वीतेसाठी एनसीसी कॅडेटसह स्कॉऊट व गाईडच्या सदस्यांना त्यात सहभागी करण्याच्या सूचना श्री. केदार यांनी दिल्या. या कार्यक्रमात देशक्तीपर गीतच राहणार याची दक्षता घ्या. वातावरण निर्मिती होण्यासाठी ते महत्वाचे आहे.

शेवटी एरोमॉडेलिंग शो च्या कार्यक्रमाची रुपरेषा ठरविण्यात आली.