Home ताज्या बातम्या क्वारंटाईन स्टॅम्पचा लहान मुलांच्या हातावर झाल्या जखमा

क्वारंटाईन स्टॅम्पचा लहान मुलांच्या हातावर झाल्या जखमा

रत्नागिरी: कोरोनाचा वाढता फैलाव रोखण्यासाठी राज्यात तिसऱ्या टप्प्यात लॉकडाऊन अवलंबण्यात आलं आहे. लॉकडाऊनमुळे गेल्या 3 महिन्यांपासून अडकलेली लोकं आता त्यांच्या घरी जाण्यासाठी निघाली आहेत. मुंबई किंवा अन्य शहरी भागातून कोकणात येणाऱ्या लोकांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. यामध्ये अनेकांच्या हातावर क्वारंटाईनचा स्टॅम्प मारण्यात आला आहे. पण यातून आता नवीन समस्या निर्माण झाली आहे.

परजिल्ह्यातून रत्नागिरीत येणाऱ्या प्रत्यके माणसाची चौकशी करून आवश्यकता असेल तर संस्थात्मक विलग करण्यात येतं आहे. तर इतरांना होम क्वारंटाईनचा स्टॅम्प मारला जात आहे. पण या मारल्या जाणाऱ्या स्टॅम्पचा लहान मुलांच्या स्किनवर परिणाम होऊन त्याठिकाणी जखमा होत असल्याचं प्रकार समोर येत आहेत.

गुहागरमध्ये आलेल्या अनेक लहान मुलांच्या हातावर अश्याप्रकारे जखमा झाल्याच्या घटना वाढत असल्यामुळे पालकांसमोर आता वेगळीच चिंता आहे. मुलांच्या हातावर मारलेल्या स्टॅम्पचा असा साईड इफेक्ट होतो आहे. गुहागरमध्ये अश्या अनेक तक्रारी आहेत. दरम्यान, साऱ्या जगावर सध्या कोरोनाव्हायरसचे (Coronavirus) संकट आहे. जगभरातील 190 देश या रोगाशी दोनहात करत आहेत. यातच आता युनायटेड नेशन्सच्या आंतरराष्ट्रीय बाल आपातकालीन निधी (UNICEF) या संस्थेनं असा इशारा दिला आहे की, येत्या 6 महिन्यात जगभरातील तब्बल 12 बालकांचा मृत्यू कोव्हिड-19 मुळे होऊ शकतो.

UNICEFच्या म्हणण्यानुसार, कोरोनाव्हायरस रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर तर केला आहे, मात्र यामुळं आरोग्य सेवा मिळत नाही आहेत. याच कारणामुळं 6 महिन्यात दररोज 6000 नवजात बालकांचा मृत्यू होऊ शकतो, अशी शक्यता UNICEFनं वर्तवली आहे. UNICEFनं नुकत्याच केलेल्या एका अभ्यासानुसार, या मुलांचा मृत्यू हा कोरोनामुळं नाही तर आरोग्या सेवेच्या अभावामुळं होणाऱ्या इतर आजारांमुळे होऊ शकतो. UNICEFच्या मते लहान मुलांच्या मृतांचा आकडा हा कोरोनाला बळी पडलेल्या रुग्णांच्या आकड्यापेक्षा वेगळा असेल.