Home ताज्या बातम्या सर्वच क्षेत्रातील कामगार व मालक यांना न्याय देणार:- कामगार मंत्री वळसे पाटील

सर्वच क्षेत्रातील कामगार व मालक यांना न्याय देणार:- कामगार मंत्री वळसे पाटील

0

परवेज शेख क्षेत्रातील कामगार व मालक यांना न्याय देणार:- कामगार मंत्री वळसे पाटील एन आय पी एम व महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने “नवीन सरकार कडून उद्योजकांच्या काय अपेक्षा….” या विषयावर महाराष्ट्रातील प्रमुख कंपन्यांचे एच आर व प्रायव्हेट सिक्युरिटी पार्टनरशीप प्रोग्रॅम (पी-४) त्यांचे प्रतिनिधी या स्नेहसंमेलना साठी उपस्थितीत होते.

महाराष्ट्र राज्याचे मा. ना.दिलीप वळसे पाटील कामगार व राज्य उत्पादन शुल्क मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.

एन आय पी एम चे राष्ट्रीय अध्यक्ष मा.विश्वेश कुलकर्णी, विधीतज्ञ कामगार कायदे तज्ञ आर वाय जोशी, महाराष्ट्र राज्य किमान वेतन सल्लागार मंडळाचे अध्यक्ष डॉ. रघुनाथ कुचिक, मा. प्रदीप गारटकर (अध्यक्ष रा.कॉं.पार्टी पुणे), डॉ.भावे इ मान्यवर मंचावर उपस्थित होते.
ऍड. जोशी यांचे ‘नव्या सरकारकडून उद्योगजगताच्या अपेक्षा’ या विषयावर भाषण झाले. या वेळी रोजगार देताना उद्योगांना लवचिकता दिली जावी, कंत्राटी कामगारांना नियमित कामगारांप्रमाणे पगार द्यावा, माथाडी कायद्याच्या दुरुपयोगाला आळा घालावा, माथाडी कामगारांच्या वेतननिश्चितीसाठी कायद्यात तरतूद करावी, केंद्राच्या चारही श्रम संहितांच्या अनुरूप नियम तयार करावेत आणि कामगार व औद्योगिक न्यायालयात न्यायाधीश नियुक्तीनंतर तत्काळ अधिसूचना काढावी, अशा अपेक्षाही त्यांनी व्यक्त केल्या.

‘माथाडी कामगार कायद्याचा दुरुपयोग होत असेल, तर तो थांबला पाहिजे. या कायद्यात सुधारणांची आवश्यकता असेल, तर कायद्याशी संबंधित सर्व घटकांसोबत, कामगार नेत्यांसोबत चर्चा करून मार्ग काढला जाईल,’ असे आश्वासन राज्याचे कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले.

‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पर्सोनेल मॅनेजमेंट’च्या पुणे शाखेच्या वतीने कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांचा औद्योगिक कंपन्यांच्या मनुष्यबळ व्यवस्थापकांसोबत संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते.

‘कामगार क्षेत्रात काही कायदे कालबाह्य झाले असतील, पण या कायद्यांची निर्मितीची वेळ आणि परिस्थिती समजून घेतली पाहिजे,’ असे म्हणत वळसे पाटील यांनी माथाडी कामगार कायद्याचे आणि मुंबईतील कापड गिरणी कामगारांच्या संपाचे उदाहरण दिले. ‘माथाडी कामगारांचे शोषण थांबविण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या कार्यकाळात माथाडी कामगार कायदा तयार झाला. आज या कायद्याचा कदाचित दुरुपयोग होत असेल, तर तो थांबला पाहिजे. मुंबईतही अतिटोकाला जाऊन काम करणाऱ्या कामगार संघटनांमुळे तेथे औद्योगिक वातावरण राहिलेले नाही. काळासोबत सर्वांनीच बदलण्याची गरज आहे,’ असे आवाहनही वळसे पाटील यांनी केले. तसेच कामगार आणि मालक हे दोन्ही घटक महत्त्वाचे आहेत.

स्पर्धात्मक युगात गुंतवणूकदार, उद्योग क्षेत्र आणि कामगारांना टिकायचे असेल, तर सर्वांनी एकमेकांना समजून घेतले पाहिजे. या सर्व घटकांसाठी विन विन सिच्युएशन तयार करायची असेल, तर कायद्यांमध्ये बदल करणे गरजेचे आहे. त्यासाठी सर्व घटकांच्या सूचना घेऊन मार्ग काढला ज


…..
या प्रसंगी कॉर्डन सिक्युरिटी अँड अलाईड सर्व्हिसेस प्रा. ली. बी टी कवडे रोड, जी.१.एस सिक्युर सोल्युशन प्रा. ली. रहाटणी, फिनिक्स सिक्युरिटी एन्ड फॅसिलिटीस सर्व्हिसेस कात्रज, परफेक्ट सर्व्हिसेस प्रोप्रटी सोल्युशन वाकड, रिलायबल एच आर फॅसिलिटी प्रा. लि. दिघी, भारत शिल्ड फोर्स प्रा. ली. हडपसर, एन एस पी एस प्रा. ली. हडपसर, एस जे फॅसिलिटी मॅनेजमेंट सुसगाव, सहारा एन्टरप्राइसेस वाघोली, डी के ग्रुप मॅनपावर सर्व्हिसेस बिबवेवाडी, थर्ड आय सिक्युरिटी & बाउन्सर सर्व्हिसेस देहूरोड, प्रोटेक्ट शिल्ड फोर्स पिंपरी चिंचवड, बालाजी सिक्युरिटी फोर्स आळंदी , त्रिशूल सिक्युरिटी सर्व्हिसेस, ईगल आय बाउन्सर & गार्डस ग्रुप प्रा. लि. एन आय बी एम, राजतारा फॅसिलिटीज सर्व्हिसेस हडपसर, आर ३ एस सिक्युरिटी सर्विसेस …इ सन्मानीय कंपनीचे मालक उपस्थित होते.

पी-४ चे मुख्य समन्वयक सचिन मोरे यांनी एन आय पी एम चे राष्ट्रीय अध्यक्ष मा.विश्वेश कुलकर्णी, विधीतज्ञ कामगार कायदे तज्ञ आर वाय जोशी, महाराष्ट्र राज्य किमान वेतन सल्लागार मंडळाचे अध्यक्ष डॉ. रघुनाथ कुचिक, मा. प्रदीप गारटकर (अध्यक्ष रा.कॉं.पार्टी पुणे), डॉ.भावे यशस्वी संस्थेच्या संचालिका स्मिता धुमाळ,व्यवस्थापक योगेश रांगणेकर,प्रशांत कुलकर्णी,अमृता मॅडम, अमला मॅडम, श्रीकांत तिकोने इ मान्यवरांचे विशेष आभार मानले.