Home गुन्हा खडक पोलीस स्टेशनची धडाकेबाज कामगिरी सराईत गुन्हेगाराकडुन वाहन चोरीचे ३ गुन्हे उघड

खडक पोलीस स्टेशनची धडाकेबाज कामगिरी सराईत गुन्हेगाराकडुन वाहन चोरीचे ३ गुन्हे उघड

0

पुणे : परवेज शेख

खडक पोटे तपास पथकाची कामगिरी
सराईत गुन्हेगाराकडुन वाहन चोरीचे ३ गुन्हे उघड
बातमीदाराने बातमी दिली की, सुमारे 10 ते 12 दिवसांपुर्वी गुरुव्दार भवानी पेठेतुन खडक पोलीस स्टेशनचे रेकॉर्डवरील गुन्हेगार सुरुज ऊर्फ पापा जाधव रा काशेवाडी पुणे याने व त्याचा मित्र साहिल शेख
रा.काशेवाडी,भवानी पेठ पुणे यांनी एक पांढर रंगाची अॅव्हीएटर गाडी चोरली असुन ते धोबी घाट, शंकरशेठ रोडवर थांबलेले आहेत,अशी खात्रीशीर माहिती मिळाली त्याप्रमाणे सदरची बातमी मा. भरत जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक खडक पोलीस स्शन पुणे यांना कळवुन त्यांचे मार्गदर्शनाखाली सदर ठिकाणी
तपास पथकाचे कर्मचाऱ्यासह झडप घालुन इसम नामे १) सुरज ऊर्फ पापा रमेश जाधव वय १९ वर्षे रा.काशेवाडी,२) साहिल ऊर्फ मुन्ना सुनावर शेख वय १९ वर्षे दिपज्योत तरुण
मंडळाजवळ, ६११, यांना ताब्यात घेतले, त्याचेकडे मिळुन आलेल्या 50,000/- रु किं चे पांढऱ्या रंगाची अॅव्हीएटर MH-12-LF-1323 हीचे कागदपत्राची मागणी करता ते उडवा उडवी
व असमाधानकार उत्तरे देवुन लागल्याने त्याचा आम्हांस संशय आल्याने त्यांनी सदरची गाडी ही गुरुव्दार भवानी पेठ येथुन चोरली असल्याचे सांगितल्याने, त्यागाडी बाबत खडक पोलीस स्टेशन गुन्हा दाखल आहे.

सुरज ऊर्फ पापा रमेश जाधव याचेवर खडक पोलीस
स्टेशनला घरफोडी, वाहनचोरी व इतर चोरीचे व साहिल ऊर्फ मुन्ना मुनावर शेख याचेवर खडक पोलीस
स्टेशनला खुनाचा प्रयत्न, घरफोडी अशा स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.

सदर कारवाई ही श्री.श्रीकांत तरवडे, अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग पुणे , श्रीमती. स्वपना गोरे, पोलीस उप आयुक्त परिमंडळ १ व श्री. प्रदिप आफळे ,सहा पोलीस आयुक्त फरासखाना विभाग यांचे मार्गदर्शनाखाली खडक पोलीस स्टेशन चे श्री. भरत जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.उत्तम चक्रे पोलीस निरीक्षक (गुन्हे) तपास पथकाचे प्रभारी सहा पोलीस निरीक्षक श्री.उमाजी राठोड, पोलीस कर्मचारी, अजिज बेग, विनोद जाधव, गणेश सातपुते, राहुल धोत्रे, रवी लोखंडे, विशाल जाधव, प्रमोद नेवसे, राकेश क्षीरसागर, समीर माळवदकर, संदिप कांबळे, रोहन खैरे, इम्रान नदाफ, यांचे पथकाने केली आहे