Home ताज्या बातम्या खडक पोलीस ठाणे,पुणे शहर हरवलेला मुद्देमाल शोधून मूळ मालकाच्या ताब्यात दिला

खडक पोलीस ठाणे,पुणे शहर हरवलेला मुद्देमाल शोधून मूळ मालकाच्या ताब्यात दिला

0

खडक पोलीस ठाणे,पुणे शहर
हरवलेला मुद्देमाल शोधून मूळ मालकाच्या ताब्यात दिला

पुणे : परवेज शेख

खडक पोलीस ठाणे अंकित सुभानशहा पोलीस चौकीस दिवसपाळी कर्तव्यावर डयुटी अंमलदार पोना
२२३ गरूड व मपोशि सोनवणे असे हजर असताना, चौकीस १७.०० वाजण्याचे सुमारास महिलानामे प्रतिभा
संतोष गायकवाड वय ३० वर्षे, रा, धायरी, सिंहगड रोड पुणे यांनी येवून कळविले की, त्यांचा अन्ड्रॉइड मोबाईल फोन व पर्स सुभानशहा दर्गा पाशी हरविली असून ती शोधणेकामी मदत करणेबाबत विनंती केली असता, नमुद कर्मचारी पोना गरूड व मपोशि सोनवणे यांनी सदर ठिकाणी जावुन आजु-बाजुचे परिसरात, दुकानदारांकडे चौकशी केली असता, विधाता एम्बोडिरीजचे दुकानाचे बाहेर एका पर्समध्ये मोबाइलची रिंग
वाजताना दिसून आला. सदर पर्स ताब्यात घेवून नमुद कर्मचारी यांनी त्याबाबत तक्रारदार महिला यांचेकडे चौकशी केली असता, सदर मोबाईल फोन व पर्स त्यांचीच असल्याची सांगितले.

सदर मोबाईल फोन व पर्सबाबत योग्य ती खातरजमा करून सदरची पर्स व मोबाईल फोन तक्रारदार यांना परत करण्यात आलेला आहे. पोलीसांनी केलेल्या सहकार्याबद्दल तक्रारदार यांनी आभार मानले आहे.