Home ताज्या बातम्या खडक पोलीस ठाणे कार्यक्षेत्रातामधील काशेवाडी व लोहीयानगर भागातील नागरिकांना इन्फोसेस हिंजवडी, पुणे कपंनीकडुन प्राप्त दहा हजार मास्कचे वाटप

खडक पोलीस ठाणे कार्यक्षेत्रातामधील काशेवाडी व लोहीयानगर भागातील नागरिकांना इन्फोसेस हिंजवडी, पुणे कपंनीकडुन प्राप्त दहा हजार मास्कचे वाटप

0

खडक पोलीस ठाणे कार्यक्षेत्रातामधील काशेवाडी व लोहीयानगर भागातील नागरिकांना इन्फोसेस हिंजवडी, पुणे कपंनीकडुन प्राप्त दहा हजार मास्कचे वाटप

पुणे : परवेज शेख पुणे:खडक पोलीस ठाणे कार्यक्षेत्रात कोवीड – 19 बाधीत व्यक्ती मिळुन येण्याचे प्रमाण दिवसेंदिवस जास्त प्रमाणात वाढत चाललेले आहे. कोवीड – 19 यास प्रतिबंधक करणेकरीता व त्याचा प्रसार आणखी इतर भागामध्ये वाढु नये याकरीता विविध स्तरांवर पोलीस ठाणेकडुन उपाययोजना चालू आहेत.

कोवीड – 19 याचा प्रादुर्भाव रोखणेकरीता श्री. प्रविण कुलकर्णी, इन्फोसेस पुणे सेंट्रल प्रमुख, हिंजवडी, पुणे या कंपनीकडुन नागरिकांना वाटप करणेबाबत मास्क 10,000 (दहा हजार) प्राप्त झाले होते. सदर मास्कचे दिनांक 22/05/2020 रोजी श्री. अशोक मोराळे, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, पुणे, डॉ. संजय शिंदे, अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे व श्री. प्रविण कुलकर्णी, इन्फोसेस पुणे सेंट्रल प्रमुख, हिंजवडी, पुणे यांचे हस्ते लोहीयानगर झोपडपट्टी व काशेवाडी झोपडपट्टी, भवानी पेठ मधील रहिवाशी यांना सोशल डिस्टÏन्सगचे नियमांचे पालन करुन सदर ठिकाणी कोणत्याही प्रकारे गर्दी होऊ न देता वाटप करण्यात आले. भविष्यकाळात देखील सदर कपंनीकडुन नागरिकांसाठी आणखी मास्क मिळणार आहेत.
सदर वेळी श्रीमती स्वप्ना गोरे, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ 1 पुणे शहर, श्री. प्रदीप आफळे, सहा. पोलीस आयुक्त, फरासखाना विभाग, पुणे, श्री. उत्तम चक्रे, पोलीस निरिक्षक (गुन्हे) खडक पोलीस ठाणे, पुणे, कर्नल श्री. जोशी, इन्फोसेस सिक्युटिरी प्रमुख, श्री. दत्ता पंडीत, सी.एस.आर.सी.आर.ओ, पुणे हे हजर होते