पुणे : परवेज शेख
अधिक माहिती अशी की दिनांक २३/०७/२०१९ रोजी ते दिनांक २४/७/२०१९ रोजी सिद्धेश्वर श्रीधर डांगे , राहणार ५७६ काशेवाडी विशाल क्रांती तरुण मंडळ जवळ भवानी पेठ पुणे व त्यांचे सर्व कुटुंबीय जागरण गोंधळाच्या कार्यक्रमासाठी उरळीकांचन पुणे येथे राहत्या घराला कुलूप लावून गेले असताना कोणीतरी अज्ञात चोरट्याने घराचे कुलूप कशातरी साह्याने तोडून लोखंडी कपाटाचे लॉक कर मध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण ७४८००/- रुपये किमती चा मुद्देमाल घरफोडी करून चोरी केला, त्याबाबत खडक पोलीस स्टेशन मध्ये गुन्ह्याची नोंद झाली होती.
गुन्ह्यातील आरोपी चा खडक पोलीस तपास पथकातील कर्मचारी हरएक प्रकारे शोध घेत होते तेव्हा पोकॉ. अशिष चव्हाण व पोकॉ. महावीर धावणे यांना त्याचे बातमीदाराने बातमी दिली की काशेवाडी भवानी पेठ येथील घरफोडी ही रेकॉर्डवरील गुन्हेगार अजय उर्फ राजा सुखदेव शिंदे राहणार काळेवाडी पुणे याने केली असून तो राहते घरी आलेला आहे अशी खात्रीशीर माहिती मिळवून आल्याने त्याच्या राहत्या घरातून ताब्यात घेतले, त्याच्याकडे दाखल गुन्ह्यातील चोरीस गेलेले सोन्याचे दागिने व रोख रकमे बाबत तपास करता त्याने सदरचा मुद्देमाल राहत्या घरात लपवून ठेवला असल्याचे सांगितल्याने त्याच्याकडून दाखल गुन्ह्यात चोरीस गेलेले पैकी १) २६०००/- किमतीचा एक सोन्याची जोधळ चार पदरी मागे काळे मणी असलेली. २) १३०००/- रुपये किमतीची सोन्याची बोरमाळ ३) २६००/- रुपये किमतीची सोन्याची ४) ५४००/- रुपये किमती चे दोन लहान सोन्याचे बदाम ५) ७८००/- रुपये किमतीचे कानातील एक जोड कर्णफुले व २००००/- रुपये रोख रक्कम असा एकूण ७४८००/- रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे सदर आरोपीवर यापूर्वी घरफोडीचा गुन्हा दाखल आहे.
सर्व कारवाई ही श्री. श्रीकांत तरडे , अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे, श्रीमती स्वप्ना गोरे,पोलीस उपायुक्त परिमंडळ १ व श्री. प्रदीप आफळे, सहाय्यक पोलीस आयुक्त फरासखाना विभाग यांचे मार्गदर्शनाखाली खडक पोलीस स्टेशन चे श्री. भरत जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. उत्तम चक्रे, पोलीस निरीक्षक (गुन्हे ) तपास पथकाचे प्रभारी श्री. उमाजी राठोड, सहाय्यक पोलीस निरीक्षक व पोलीस कर्मचारी विनोद जाधव, गणेश सातपुते, महावीर दानवे, आशिष चव्हाण, राकेश शिरसागर, समीर माळवदकर, बंटी काबळे, प्रमोद नेवसे , रवी लोखंडे, इम्रान नदाफ, योगेश जाधव, विशाल जाधव, हिम्मत होळकर, यांचे पथकाने कामगिरी केली.