Home गुन्हा खडक पोलीस स्टेशनची कामगिरी टिंबर मार्केट मध्ये कमरेला कोयता लावून दहशत माजवणाऱ्यास अटक

खडक पोलीस स्टेशनची कामगिरी टिंबर मार्केट मध्ये कमरेला कोयता लावून दहशत माजवणाऱ्यास अटक

0

पुणे : परवेज शेख सदर बाबत अधिक माहिती अशी की, दिनांक २/१०/२०१९ रोजी तपास पथकाचे अधिकारी कर्मचारी हे कार्यालयात हजर असतांना पोलीस कॉन्स्टेबल समीर माळवदकर व पोलीस कॉन्स्टेबल संदिप कांबळे यांना त्यांचे बातमीदाराने बातमी दिली की, टिंबर मार्केट, सावित्री बाई फुले स्मारकाचे बाजुला, सार्वजनीक रस्त्यावर एक मुलगा अंगाने सडपातळ, रंगाने गव्हाळ, असुन त्याने अंगात निळ्या रंगाची जिन्स पॅन्ट व मळकट पांढ-या रंगाचा शर्ट घातलेला असुन त्याने कमरेला कोयता लावलेला आहे, अशी खात्रीशीर माहिती झाल्याने सदरची बातमी मा. श्री भरत जाधव खडक पो स्टे पुणे यांना सांगुन त्याचे अधिपथ्याखाली सदर ठिकाणी सापळा लावुन इसम नामे पंकज गोरख वाघमारे क्य २३ वर्षे रा. बंन्टर शाळेजवळ, मिरेकर कॉलनी,गाडीतळ हडपसर पुणे यास पकडुन त्याचे कंबरेला खोचलेला ३५०/- रुपये किमतीचा लोखंडी कोयता मिळुन आल्याने त्याचे विरुध्द खडक पोलीस स्टेशन गुन्हा रजि नं ३७०/२०१९ भा.दं.वि कलम ४ सह ३५, महाराष्ट्र पोलीस अधिनियम ३७(१) सह १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे.

वरील गुन्हयाचा तपास करीत असतांना, दिनांक १२/५/२०१९ रोजी रात्री २२/३० या सुमारास विकास वावळे याचे घरासमोरील, मांजराई नगर मांजरी बुद्रुक पुणे येथुन महिला नामे सो.रेणुका दिलीप ढिले वय ४५ वर्षे .मासे विक्री रा.मांजराई नगर मांजरी बुद्रुक ता.हवेली जि.पुणे हे त्यांचे पती दिलीप ढिले यांचे सोबत मोटर सायकवरुन घरी जात असतांना मुंढवा येथे झाले भांडणाचा राग मनात धरुन इसम नामे बिटया ऊर्फ स्वापनील कुचेकर, दिपक कुचेकर, संजय कुचेकर, राकेश थोरात, राहुल सांवत, पंकज वाघमारे, तन्मय बडगे, निलेश आरते, अक्षय तारु, अंकुश वाडेकर, इम्रान शेख, ओंकार इगवे, मंजुनाथ बगलाड, असे सर्वांनी मिळुन दिलीप ढिले यांचे मानेवर धारदार शस्त्राने वार करुन लाकडी दंडक्याने पाठीवर व पायावर मारहाण करुन व त्याचे डोक्याचे केस पकडुन त्यांना जमीन आपटले
व रेणुका दिलीप ढिले हे भांडणे सोडविण्यास मध्ये पडले असता त्याचे सुध्दा मानेवर धारदार शस्त्राने वारुन करुन त्यांना गंभीर जखमी केले होते,

सदर कारवाई ही श्री श्रीकांत तरवडे, अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग पुणे ,श्रीमती. स्वपना गोरे, पोलीस उप आयुक्त परिमंडळ १ व श्री. प्रदिप आफळे सहा पोलीस आयुक्त फरासखाना विभाग यांचे मार्गदर्शनाखाली खडक पोलीस स्टेशन चे श्री. भरत जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.उत्तम चक्रे पोलीस निरीक्षक (गुन्हे) तपास पथकाचे प्रभारी सहा पोलीस निरीक्षक श्री.उमाजी राठोड, पोलीस कर्मचारी, अजिज बेग, विनोद जाधव, गणेश सातपुते, संदिप पाटील, राहुल धोत्रे, समीर माळवदकर, सागर केकान, राकेश क्षिरसागर, संदिप कांबळे, रवी लोखंडे, योगेश जाधव, विशाल जाधव, रोहन खरे, इम्रान नदाफ, यांचे पथकाने केली आहे.