Home गुन्हा खडक पोलीस स्टेशन हद्दीतील सराईत गुन्हेगारास 1 वर्ष तडीपार करण्यात आले आहे

खडक पोलीस स्टेशन हद्दीतील सराईत गुन्हेगारास 1 वर्ष तडीपार करण्यात आले आहे

0

पुणे : परवेज शेख

मा. व्यंकटेशम, पोलीस आयुक्त, पुणे शहर व मा. रविंद्र शिसवे, पोलीस सह आयुक्त, पुणे, शहर,मा.श्रीकांत तरवडे,अपर पोलीस आयुक्त,पश्चिम विभाग,पुणे शहर यांनी आगामी गणेशोत्सव व विधानसभा निवडणूक च्या काळात पुणे शहरात कोणताही अनुचीत प्रकार घडू नये व आपले गुन्हेगारी वर्चस्व निर्माण करणारे टोळीचा/गुन्हेगारांचा समुळ नायनाट करण्यासाठी, त्यांचेविरुध्द कडक व ठोस कारवाई करण्याबाबत सर्व प्रभारी अधिकारी यांना आदेश दिलेले आहेत.

खडक पोलीस स्टेशन हद्दीतील सराईत गुन्हेगार-योगेश मारूती गायकवाड वय-२२ वर्षे रा.महादेव मंदिरा शेजारी,कासेवाडी,भवानीपेठ, पुणे. हा अत्यंत क्रुर, खुनशी व भांडखोर असुन तो लोकांमध्ये काहीना काही कुरापती काढुन मारहाण करणे तसेच महीलांविषयक गंभीर स्वरुपाचे गुन्हे करीत आहे. सर्वसामान्य, शांतताप्रिय नागरीकांना विनाकारण त्रास देवुन आपला गुन्हेगारी हेतु साध्य करीत आहे. त्याने या भागात आपली भयंकर दहशत निर्माण केली आहे. त्याचे दहशतीमुळे व भितीपोटी त्याचेविरुध्द तक्रार देण्यास कोणीही पुढे येत नव्हते. त्याचे अशा कृत्यामुळे सर्वसामान्य नागरीकांचे मनात भिती निर्माण होवुन त्यांचे जिवीतास व मालमतेस धोका निर्माण झाला होता. म्हणुन त्यास पुणे शहर आयुक्तालय व (पुणे जिल्हयातुन हदपार करण्या बाबतचा प्रस्ताव श्रीमती स्वप्ना गोरे, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-१ पुणे शहर यांचेकडे पाठविण्यात आला होता, त्यानुसार त्यांनी त्यास पुणे शहर व पिंपरी पोलीस आयुक्तालयाचे कार्यक्षेत्रातुन एक (१) वर्षाकरीता तडीपार केले आहे.

फरासखाना विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त श्री. प्रदिप आफळे, यांचे मार्गदर्शनाखाली खडक पोलीस स्टेशन पुणे शहरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.भरत जाधव, पोलीस निरीक्षक (गुन्हे)श्री. उत्तम चक्रे, पोलीस उप निरीक्षक रत्नदीप गायकवाड, महेश बारवकर, महेश कांबळे, दिपक मोधे यांनी सदर कारवाई मध्ये भाग घेवुन प्रस्ताव तयार केलेला आहे.