Home ताज्या बातम्या खरवंडी येथे प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा

खरवंडी येथे प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा

0

नाशिक : खरवंडी येथील सरस्वती विद्यालयात प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सर्वप्रथम ध्वजारोहन गावचे उप सरपंच विठ्ठल मोरे रामनाथ भाऊ झालटे गावचे पोलीस पाटील किशोर भाऊ झाल्टे शंकर झाल्टे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले व कार्यक्रमाचे अध्यक्ष नानाभाऊ आहेर हे होते विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेऊन कार्यक्रमास सुंदर असे रूप दिले त्यातच सांस्कृतिक कार्यक्रमात झालेल्या छत्रपती शिवाजी राजे यांच्या अफजलखानाचा वध पोवाड्याने सर्व प्रेक्षकांच्या अंगावर शहारे उमटले तसेच नुकत्याच झालेल्या शालेय क्रीडा व अन्य स्पर्धा मधील प्रथम द्वितीय आणि तृतीय येणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व बक्षिसे देऊन सन्मानित करण्यात आले गावातील ग्रामस्थ व पंचक्रोशी ग्रामस्थांचा याठिकाणी उत्तम प्रतिसाद दिसून आला सदर प्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक तसेच सर्व शिक्षक वृंद सैनिक सरपंच उपसरपंच पोलीस पाटील सदस्य व गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.