खळबळजनक! पवईत २२ वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने हत्या

- Advertisement -

मुंबई : पवई येथे तुंगा गावातील लोढा सुप्रीम पार्क परिसरात एका २२ वर्षीय तरुणाची हत्या केल्याची घटना घडली आहे. ही घटना आज सकाळी ११.५८ वाजताच्या सुमारास घडली. सणासुदीच्या म्हणजेच दिवाळीच्या पहिल्याच दिवशी ही घटना घडल्याने परिसरात एकाच खळबळ उडाली. रिषभ सिंग उर्फ अंकित सिंग असं हत्या केलेल्या तरुणाचं नाव आहे. 

अंकित हा नालासोपारा येथील राहणार असून त्याची अज्ञात इसमाने पवई येथील लोढा सुप्रीम पार्क परिसरात धारदार शस्त्राने रिषभच्या गेल्यावर वार करून जीवे ठार मारले. या हत्येचे कारण अस्पष्ट असून पवई पोलीस याप्रकरणी तपास करत आहेत. याप्रकरणी पवई पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरोधात खुनाचा गुन्हा दाखल असून पोलीस या घटनेचा तपास करत आहेत. 

- Advertisement -