Home ताज्या बातम्या खारघर पोलीस ठाण्याकडून धडक कारवाई

खारघर पोलीस ठाण्याकडून धडक कारवाई

0

खारघर पोलीस ठाण्याकडून धडक कारवाई

दर्शन पोलीस टाइम : परवेज शेख

खारघर- कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता पंतप्रधानांनी 21 दिवसांचं लॉकडाऊन घोषित केलं आहे. तरीही खारघर मधील रहिवासी विनाकारण घराबाहेर पडत आहेत. अशाच विनाकारण घराबाहेर फिरणाऱ्या लोकांवर कारवाई करून सहा वाहने जप्त करण्यात आली आहेत तर मॉर्निंग वॉकसाठी फिरणाऱ्या 46 लोकांवर कारवाई करण्यात आली आहे.

खारघर पोलीस ठाण्याच्या हद्दीत कलम 144 अन्वये संचारबंदीचे आदेश लागू आहेत. तरीसुद्धा नागरिक मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर येत असल्याने विनाकारण फिरणाऱ्यांचे वाहने पोलीस स्टेशनला जप्त करुन गुन्हा दाखल केला जात आहे. यासोबतच सकाळी मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या एकूण 46 लोकांना ताब्यात घेऊन त्यांना पोलिस स्टेशनला आणून त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असुन याला वेळीच पायबंद घालण्याची आवश्यकता आहे. म्हणून खारघरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप तिदार यांनी नागरिकांना संचारबंदीच्या आदेशांचे काटेकोरपणे पालन करावे अशी विनंती केली आहे

आदेश

1) कोणीही घराबाहेर पडू नये.
2) अत्यावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी पंधरा दिवसांनी किंवा महिन्यातून फक्त एकदा व एका कुटुंबातील एकाच व्यक्तीने घराबाहेर पडावे.
3) सर्व ठिकाणी मास्क वापरावा व सोशल डिस्टन्सींग ठेवावे.