Home अश्रेणीबद्ध खुनाचा गुनाह करून तिन वर्षापासून आरोपिस अटक

खुनाचा गुनाह करून तिन वर्षापासून आरोपिस अटक

0

मुंबई : शफीक शेख खुनाचा गुनाह करून तिन वर्षापासून आरोपिस अटक सन 2016 मध्ये वालीव पोलीस ठाण्याच्या हद्दीत धानीवबाग येथे इसम नामे संदीप राकेश मिश्रा वय 20 वर्षे या. धानीवबाग याचा खुन केल्यावरून आरोपी नामे सुशीलकुमार बटेश्वर सिंग वय 33 वर्षे, रा. वापी, गुजरात व इतर यांच्याविरुद्ध वालीव पो.स्टे. गु.र.नं. 628/2016, भादविसं कलम 302,143,147,148,149 हा गुन्हा दि.05.11.2016 रोजी दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्यातील मुख्य आरोपी नामे सुशीलकुमार सिंग हा गुन्हा केल्यापासून फरार झाला होता. तो वापी, गुजरात येथे एका कंपनीत काम करीत होता. तो त्याच्या नातेवाईकांना भेटण्यासाठी नालासोपारा येथे येणार असल्याबाबत सपोउनि सुरेंद्र शिवदे यांना माहीती मिळाल्यानंतर त्यांनी सदर माहीती मा. पोलीस अधीक्षक साहेब, पालघर यांना दिली व आज रोजी सपोउनि सुरेंद्र शिवदे यांनी आरोपीस ताब्यात घेऊन वालीव पोलीस ठाण्याकडे रिपोर्टसह वर्ग केले आहे. सदर आरोपीने वापी येथील पत्त्यावर आधार कार्ड बनवून घेतले होते.