Home गुन्हा खुनाचे गुन्हयातील आरोपी १२ तासात अटक गुन्हेशाखा व चतुःश्रृंगी पोलीस स्टेशनची कारवाई

खुनाचे गुन्हयातील आरोपी १२ तासात अटक गुन्हेशाखा व चतुःश्रृंगी पोलीस स्टेशनची कारवाई

0

पुणे : परवेज शेख

मा. अपर पोलीस आयुक्त,गुन्हे, श्री. अशोक मोराळे, व मा. पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, श्री. बच्चन सिंह यांनी सदर गुन्हयातील वाहनाचे प्राप्त आरटीओ क्रमांकावरुन सविस्तर माहिती काढून आरोपींचा शोध घेणेकामी मार्गदर्शन केले व सदर वाहनाचे मालकाची सविस्तर माहिती प्राप्त करुन दिली. यावरुन गुन्हेशाखा युनिट-४ चे गथक व चतुःश्रृंगी पोलीस स्टेशन कडील पथक संयुक्तरित्या काम करीत असताना सदरचे वाहन हे विशाल संजय शिंदे, रा. रामकृष्ण मंगल कार्यालयाजवळ, पिंपळेगुरव, नवी सांगवी, पुणे याने वापरल्याचे व त्याचे सोबत त्याचे साथीदार नामे प्रशांत कामसे, सोमनाथ चतुर ऊर्फ सोन्या, अभिषेक लालाकोंडे व आणखीन एक इसम यांनी केल्याचे निष्पन्न झाले.गुन्हेशाखा, युनिट-४ कडील दत्तात्रय फुलसुंदर व विशाल शिर्के यांना माहिती मिळाली की,आदर्शनगर नवी सांगवी, पुणे येथे विशाल शिंदे व प्रशांत कामसे हे एका शाळेजवळ लपल्याचे व ते बाहेरगावी पळून जाणार असले बाबत बातमी मिळाली. त्यावरुन त्यांना आज दि.०२/०९/२०१९ रोजी दुपारी ०३/१५ वा. पकडण्यात आले व यातील सोमनाथ कल्याण चतुर ऊर्फ सोन्या, रा. मुळशी जि. पणे व अभिषेक लाला कोरडे ऊर्फ ब्लॅक्या, रा. पिंपळेगुरव, नवी सांगवी, पुणे यास चतुःश्रंगी पोलीस स्टेशनचे तपास पथकाने पकडले आहे.

यातील फिर्यादी राम प्रभू मोटे यांनी चाणाक्षपणे घटने नंतर लागलीच वाहनाचा नंबर घेतल्याने व तो पोलीसांना तात्काळ दिल्याने सदरचा गुन्हा उघडकीस आणणेकामी त्यांची मदत झालेली आहे.

सदरची कामगिरी ही मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे श्री. अशोक मोराळे, मा. अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग श्री. सुनिल फुलारी, मा. पोलीस उप-आयुक्त, गुन्हे श्री. बच्चन सिंह, मा. पोलीस उप-आयुक्त, परिमंडल-४ श्री. प्रसाद अक्कानवरु, मा. सहा.पोलीस आयुक्त, खडकी विभाग श्री. लक्ष्मण बोराटे, पोलीस निरीक्षक, युनिट -४, गुन्हे शाखा पुणे शहर श्री. अंजुम बागवान, पोलीस निरीक्षक. चतःश्रंगी पो.स्टे. (गुन्हे) श्रीमती वैशाली गलांडे, यांचे मार्गदर्शनाखाली स.पो.नि. गणेश पवार पोलीस उप-निरीक्षक, विजय झंजाड, कर्मचारी दत्तात्रय फुलसुंदर, विशाल शिर्के, सुनिल पवार, शंकर संपते, रमेश चौधर, निलेश शिवतरे, गुन्हे शाखा, पुणे शहर व स.पो.नि. दत्तात्रय शिंदे, पोलीस उप- निरीक्षक. चव्हाणके, पो.हवा. मुकुंद तारु, एकनाथ जोशी, पो.ना.सारस साळवी, प्रकाश आव्हाड, विशाल साबळे, अजय गायकवाड, पो.शि. तेजस चोपडे, ज्ञानेश्वर मुळे, अमर शेख यांनी केलेली आहे.