Home बातम्या महत्वाच्या बातम्या खुशखबर ! आता मिळणार ‘E – पासपोर्ट’

खुशखबर ! आता मिळणार ‘E – पासपोर्ट’

नवी दिल्ली : मोदी सरकार आता चिप स्वरूपातील पासपोर्ट आणण्याच्या तयारीत आहे. यासंबंधी सर्व काम पूर्ण झाले आहे. याचे सॉफ्टवेअर आयआयटी कानपुर आणि नॅशनल इंफॉर्मेटिक्स सेंटर या दोन संस्थांनी मिळून तयार केले आहे. नव्या पासपोर्टमध्ये पेपरची गुणवत्ता पहिल्यापेक्षा चांगली असेल. पासपोर्ट धारकाची वैयक्तिक माहिती, डिजिटल स्वाक्षरी चिपमध्ये सेव्ह केली जाईल. या पासपोर्टला ई पासपोर्ट म्हटले जात आहे. या ई पासपोर्टसोबत छेडछाड करण्याचा प्रयत्न झाल्यास लगेच तो प्रकार समोर येईल. त्यामुळे सुरक्षेच्या बाबतीत हा नवीन पासपोर्ट पहिल्यापेक्षा जास्त सुरक्षित असेल.

मोदी सरकारने या ई पासपोर्ट ची प्रक्रिया २०१७ पासूनच सुरु केली होती. योजनेनुसार या प्रकारचे ई पासपोर्ट पहिल्यांदा डिप्लोमेट्स आणि अधिकाऱ्यांना देण्यात येईल. यानंतर सामान्य लोकांना ही पासपोर्ट सेवा उपलब्ध केली जाईल.

आता विमानतळावर रांगेत उभारण्याची गरज नाही. नवीन ई पासपोर्टमुळे काही सेकंदातच पासपोर्ट धारकाची ओळख प्रमाणित केली जाईल.

चिपविषयी

या ई पासपोर्टची चाचणी अमेरिका सरकारच्या मान्यता प्राप्त प्रयोगशाळेत करण्यात आली आहे. पासपोर्टच्या मागच्या बाजूला सिलिकॉन चिप असेल. या चिपमध्ये आयताकार अँटेना लावण्यात येईल. भारतीय पासपोर्टचा रंग निळा असतो. सुरक्षेच्या कारणास्तव कोणत्याही व्यापारी कंपनीला या कामात सहभागी करून घेण्यात आलेले नाही. चिपमध्ये ६४ किलोबाईट्सची मेमरी असेल. चिपमध्ये पासपोर्ट वापरकर्त्याचा फोटो आणि फिंगरप्रिंट स्टोर असेल. चिपमध्ये ३० भेटी/ व्हिजिट्स आणि आंतरराष्ट्रीय प्रवासाची माहिती स्टोअर करण्याची क्षमता असेल.