Home गुन्हा खोटे आमिष दाखवून नागरिकाची फसवणूक सदर आरोपी खडकी पोलीस स्टेशन पुणे शहर पोलिसांकडून जेरबंद

खोटे आमिष दाखवून नागरिकाची फसवणूक सदर आरोपी खडकी पोलीस स्टेशन पुणे शहर पोलिसांकडून जेरबंद

0

पुणे : परवेज शेख

अमेरिकन डॉलरच्या नोटांचे बंडल व पुरातन वस्तु दाखवुन नागरीकांना फसवणुक ,खडकी पोलीस स्टेशन पुणे शहर पोलीसांकडुन जेरबंद दि.२९/०८/२०१९ रोजी तपास पथकातील पो.हवा/३३०४ उत्तम कदम पो.कॉ/९८०६ संदीप गायकवाड यांना त्यांच्या बातमीदाराकरवी बातमी मिळाली की, अमेरीकन डॉलरचे आमिष दाखवून फसवणुक करणारे इसम हे ग्राहकाला फसवण्याच्या उददेशांने डॉलर बाबत बोलणी करण्यासाठी खडकी बाजार येथील त्रिकोणी गार्डण ते अॅम्युनेशन फॅक्टरी रोडवर गार्डणच्य जवळ येणार असल्याची बातमी मिळाल्यांने सदर बातमी तपास पथकाचे! भारी अधिकारी प्रताप ल. गिरी यांना कळविल्यांने त्यांनी सदरबाबत वरिष्ठांना कळवून लागलीच बातमीच्या ठिकाणी जावुन सापळा रचुन खाी केली.सदर ठिकाणी बातमीप्रमाणे सांगितलेल्य वर्णनाचे तीन इसम व एक महीला आले असता त्यांना दि.२९/०८/२०१९ रोजी १५/२० वाजताचे सुमारास ताब्यात घेण्यात आली त्यांची नावे १) कबीर सलीम शेख वय २९ वर्षे रा. लक्ष्मीनगर,येरवडा पुणे मुळ पत्ता मु.सिमज हनुमान नगर जवळ, पो./ तहसिल जेसेंडी जि. देवघर राज्य झारखंड, २) मुस्तफा शहावली शेख वय ३१ वर्षे रा. लक्ष्मीनगर येरवडा मुळ पत्त बिस्मील्ला मस्जिद जवळ, मोहल्ला तहसिल लोणी ठाणा लोणी जि. गाझीयाबाद राज्य उत्तरप्रदेश ३) सलमान आलम शेख वय २६ वर्षे रा. लक्ष्मीनगर, येरवडा पुणे मुळ पत्ता ग्राम नस कॉलनी,पो.बुध्दनगर ठाणा बुध्द तहसिल लालबाग जि. गाझीयाबाद राज्य उत्तरप्रदेश ४) नसीमा बेगम मोहम्मद मुकीम वय ४८ वषेर रा. लक्ष्मीनगर येरवडा पुणे मुळ गाव झाशी चौक सिटी, जि. मदारीपुर राज्य बिहार असे सांगितले लागलीच दोन पंचाना बोलावुन आरोपीची अंगझडती घेता त्यांच्या ताब्यात एक काळया रंगाची बॅग मिळून आल्याने त्यांची पाहणी करता बॅगमध्ये अमेरीकन चलन असलेली १ डॉलरची एक नोट व २० डॉलरच्या १४ नोटा , तसेच लाल रंगाच्या रुमालामध्ये बांधलेले वर्तमान पत्राच्या पेपरचा गठठा व त्यामध्ये एक रिन कंपनीचे साबन, तसेच ११ वेगवेगळया कंपनीचे मोबाईल, सिमकार्ड – ०९ वेगवेगळया कंपनीचे असे एकुण ४३८४०/- रुपये किमतीचे साहीत्य आरोपी यांचेकडे मिळुन आले आहेत.

तसेच तपासादरम्यान आरोपीकडे तपास करता गुन्हा करतांना मिळालेले पैसे हे ते वेगवेगळया माध्यमांद्वारे लागलीच पाठवून देतात त्यामुळे सदरची रक्कम ज्या खात्यामध्ये पाठविली ते खाते व आरोपीचे खाते असे सिल केले असुन त्यामध्ये २,१९,०००/-/ रुपये सिझ करुन ठेवले आहेत असा एकुण आरोपी यांचे २,६१,८७०/- रुपये कीमतीचे साहीत्य व रोख रक्कम मिळाली आहे.

आरोपी यांची गुन्हे करण्याची पध्दत

यातील आरोपी हे लहान मोठे व्यापारी ,फळविक्रेते, भाजी विक्रेते, गाडीवरील चालक तसेच ईतर नागरीक यांचेकडुन एखादी वस्तु खरेदी करतात व त्या वस्तुचे पैसे देतांना त्यांच्याकडे असलेली २० डॉलरची अमेरीकन नोट दाखवितात व अशा भरपुर प्रमाणात आमच्याकडे नोटा असुन त्यांची आम्हाला भारतीय चलनामध्ये बदली करावयाची आहे असे सांगतात . तेव्हा नागरीकांना दाखविलेली एक नोट ही त्यांना देतात व बँकेमध्ये जावुन खाी करण्याबाबत सांगतात सदरची नोट खरी असल्याने बँक अधिकारी सदरची नोट खरी असल्याचे सांगतात त्यावरुन फिर्यादी यांचा आरोपीवर विश्वास बसतो. त्यांनतर आरोपी हे माझ्या आईला विचारावे लागेल, पतिला विचारावे लागेल असे वेगवेगळे कारणे सांगून दहा ते पंधरा दिवस त्यांच्या वेगवेगळया फोनद्वारे संपर्कात राहुन भारतीय चलनाचे पैसे जमा करण्यास सांगतात. त्यांनतर गर्दीच्या ठिकाणी मार्केट मध्ये म्हणजेच आरोपींना निघुन जाण्यासाठी दोन- तीन रस्ते असलेले ठिकाण निवडतात व त्या ठिकाणी येण्यास सांगतात व यातील ज्या आरोपींने फिर्यादी यांना संपर्क केला आहे ते दोन आरोपी समोर येतात व ईतर दोन आरोपी हे साईडला उभे राहुन लक्ष ठेवत असतात. त्यांपैकी एक जण वेडा असल्याचे सांगुन त्याची मनधरणी करावी लागेल असे भावनिक बनुवन फिर्यादीच्या पैशाची बॅग त्या वेडया आरोपीकडे देतात व वेडया आरोपीजवळील दाखविलेली डॉलरची बॅग फिर्यादी यांना देतात तेव्हा तो वेडयांचे नाटक करत असलेला आरोपी हातचलाखीने ते सर्व डॉलर काढुन घेतो व तशीच्या तशी बॅग फिर्यादीच्या हातात देतात. त्या बॅगमधील रुमालाला एवढया बारीक गाठी बांधलेल्या असतात की, फिर्यादी हे गाठी सोडुन डॉलर पाहण्यापर्यंत हे आरोपी त्या ठिकाणावरुन निघुन जातात. तरी नागरीकांनी अशा प्रकारचे इसम आपल्याला फसवण्यासाठी आल्यास पोलीसांना माहीती दयावी व अशा फसवणुकीपासुन सावध राहावे.

सदरची कारवाई ही श्री सुनिल फुलारी,अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग, श्री प्रसाद अक्कानवरु, पोलीस उपआयुक्त,परिमंडळ-४, श्री लक्ष्मण बोराटे, सहा.पोलीस आयुक्त खडकी विभाग, श्री भागवत मिसाळ वरिष्ठ पोलीस निरीक्षक,खडकी पोलीस स्टेशन,व शफिल पठाण पोलीस निरीक्षक (गन्हे) यांचे मार्गदर्शनाखाली खडकी पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे प्रभारी अधिकारी श्री प्रताप ल. गिरी पोलीस उपनिरीक्षक सहा.पो.फौ.श्री गेंगजे, सहा.पो.फौ.श्री तापकीर, पो.हवा/३३०४ कदम,पो.हवा/१७३ ठोकळ, पोना। ४९७० सावंत,पो.ना ९४७ पवार, पो.ना । ६८५० लोखंडे, पो.ना./३२७२ घटे,पो.ना.६९५१ मेमाणे पो.शि./९८०६ गायकवाड, पो.शि./८३२५ लोणकर, पो.शि/१२०१२ सोनवणे .पो.शि/८८११ माने.पो शि ८१०८ नानापरे यांनी केली असुन गुन्हयांचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रताप ल. गिरी हे करीत आहेत.