Home अश्रेणीबद्ध खोटे दागिने गहाण ठेवून सोनारांची फसवणूक करणाऱ्या भामट्यास अटक

खोटे दागिने गहाण ठेवून सोनारांची फसवणूक करणाऱ्या भामट्यास अटक

0

खोटेदागिनेगहाणठेवूनसोनारांचीफसवणूककरणाऱ्याभामट्यासअटक..

मुंबई : शफीक शेख ठाणे :- तांब्याच्या दागिन्यांवर गोल्ड प्लेटिंग करून ते दागिने सोनारांकडे गहाण ठेवून त्यांच्या कडून पैसे घेऊन फसवणूक करणाऱ्या भामट्याला ठाणे नगर पोलिसांनी अटक केली आहे.

 राकेश रमेश पुनामिया यांचे टॉवर नाका येथे पुनामिया ऑर्नामेंट्स असे सोन्याचांदीचे दुकान आहे, त्यांच्या दुकानात एक अनोळखी इसम आला त्याने आपलें नाव विक्रांत ठक्कर असून आपण ठाण्यातच राहत असल्याचे सांगितले व आपल्याकडील 29 ग्रॅम वजनाची हॉलमार्क चिन्ह असलेली सोन्याची रस्सी चैन गहाण ठेवून त्याबद्दल 60, 000/- रुपये घेतले व तेथून पोबारा केला, त्यानंतर फिर्यादी यांनी चैनची व्यवस्थित पडताळणी केली असता त्यावर गोल्ड प्लेट व आतमध्ये तांबे असल्याचे निष्पन्न झाले आपली फसवणूक झाल्याचे कळताच त्यांनी ठाणे नगर पोलीस स्टेशन मध्ये तक्रार केली त्याप्रमाणे पोलीस स्टेशन मध्ये 420 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
 पोलीस उपायुक्त सुभाष बुरसे, सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीमती नीता पाडवी ठाणे नगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामराव सोमवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित गोंधळी, पोलीस उपनिरीक्षक अशोक सावंत व त्यांच्या टीमने तांत्रिक तपास करूनराकेश बिमसेन बागला वय 34 वर्षे  अजित रोड, भटिंडा पंजाब यास मीरा रोड येथून दिनांक 28/9/2019 रोजी अटक केली, त्याच्याकडे दागिन्यांबद्दल विचारपूस केली असता तो हे दागिने उत्तर प्रदेश येथून मागवत असल्याचे निष्पन्न झाले त्यास दगिने पुरविणारा इसम शिवकुमार संजयकुमार सोनी वय 20 वर्षे हा जोनपूर उत्तर प्रदेश हा त्यास दागिने पुरविण्याकरिता मीरा रोड येथे आला असता त्यास अटक करण्यात आली आहे, त्याच्या कडे 916 हॉलमार्क व 22 कॅरेट असा शिक्का असलेल्या गोल्ड प्लेटेड बनावट एकूण 4 चैनी, 12 जेन्टस अंगठ्या, 7 कानातल्या बाली जोड असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे, हा माल ज्वेलर्सची फसवणूक करण्याकरिता मागविला होता असे त्यांनी सांगितले, आरोपीच्या तपासात आरोपी नेहमी असे प्रकारचे गुन्हे करता असल्याचे निष्पन्न झाले यापूर्वी त्यांनी धनराज निधी प्रा. ली भोसरी पुणे व नागपाडा मुबंई येथील ज्वेलर्स दुकानदार तसेच पंजाब या ठिकाणी अशा प्रकारे बऱ्याच ज्वेलर्सची फसवणूक केल्याची माहीती दिली आहे, आश्चर्याची गोष्ट म्हणजे ह्या ज्वेलर्सना आपली फसवणूक झाल्याची कल्पनाच नाही, आरोपी राकेश बगला हा पूर्वी रेमन्ड येथे कामाला होता त्याला 35 हजार रुपये पगार होता, पण डान्स बारच्या नादाला लागून तो बरबाद झाला, त्या मुळे त्याने हा गोल्डचा फसवाफसवीचा धंदा सुरु केला.