Home गुन्हा गंभीर दुखापतीच्या गुन्ह्यातील फरार व तडीपार असलेला सराईत गुंड जेरबंद

गंभीर दुखापतीच्या गुन्ह्यातील फरार व तडीपार असलेला सराईत गुंड जेरबंद

0

पुणे : परवेज शेख

मा ,डाॅ के व्यंकटेशम पोलीस आयुक्त पुणे शहर व माननीय रवींद्र शिसवे पोलीस आयुक्त पुणे यांनी पुणे शहर मध्ये सुरू असलेला गणेश उत्सवामध्ये कोणत्याही प्रकारे अनुचित प्रकार घडू नये उत्सव शांततेत पार पडावा यासाठी पोलीस अभिलेखा वरील गुंड फरारी पाहिजे व तडीपार असलेले गुन्हेगार यांचा शोध घेऊन त्यांच्या हालचालीवर नजर ठेवून त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्याबाबत सर्व पोलीस अधिकारी यांना आदेश दिलेले आहेत गुन्हे शाखा युनिट 3 पुणे येथील पोलीस अधिकारी व कर्मचारी पोलीस अभिलेखा वरील गुंड फरारी पाहिजे व तडीपार असलेल्या गुन्हेगारांची माहिती काढून त्यांचा शोध घेत असताना दिनांक 7 /9/ 2019 रोजी पोलिसांना खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीवरुन कोथरूड पोलीस स्टेशन पुणे शहर व जिल्हा मधून दोन वर्षाकरिता तडीपार केलेला गुंड नितीन रामदास सणस वय 28 राहणार चाळ नंबर 4 सर्वे नंबर 112 कोथरूड पुणे याला आठवले चौक लॉ कॉलेज रोड एरंडवणे पुणे येथे पकडण्यात आलेले आहे माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ 3 पुणे शहर यांनी त्यास दिनांक 27 /11/ 2018 पासून दोन वर्षासाठी पुणे शहर व जिल्ह्यातून तडीपार केलेले आहे.

सदर कामगिरी गुन्हे शाखा पुणे अप्पर पोलीस आयुक्त श्री अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त पुणे पुणे शहर श्री बच्चन सिंग साहेब ,सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे पुणे डाॅ शिवाजी पवार यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 3 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री राजेंद्र मोकाशी, पोलीस उपनिरीक्षक किरण अडागळे ,संजय गायकवाड, व गुन्हे युनिट-3 पथकातील पोलिस कर्मचारी अनिल शिंदे, रामदास गोणते ,अतुल साठे ,संदिप राठोड, राहुल घाडगे, दत्तात्रय गरुड , मच्छिंद्र वाळके ,गजानन गानबोटे ,कल्पेश बनसोडे, यांनी केली आहे