Home ताज्या बातम्या गणपतीपुळे येथे भाविकांची गर्दी, जिल्ह्यात माघी गणेशोत्सव साजरा

गणपतीपुळे येथे भाविकांची गर्दी, जिल्ह्यात माघी गणेशोत्सव साजरा

0

रत्नागिरी : जिल्ह्यात ठिकठिकाणी माघी गणेशोत्सवाला मंगळवारपासून प्रारंभ करण्यात आला. त्यानिमित्ताने विविध गणेश मंडळांनी श्रीगणेशमुर्तीची प्रतिष्ठापना केली आहे. गणपतीपुळे येथे माघी गणेशोत्सवानिमित्त यात्रा असल्याने दर्शनासाठी विशेष गर्दी झाली होती.

माघी गणेशोत्सव विविध सार्वजनिक मंडळे उत्साहाने साजरा करीत असल्याने त्यानिमित्ताने गणेशमुर्तीची प्रतिष्ठापना दीड ते तीन दिवसांसाठी केली जाते. यानिमित्ताने विविध धार्मिक व सांस्कृ तिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

काही गणेश मंडळांनी २७ रोजी सायंकाळी गणेशमूर्ती मंडपात आणल्या तर काही मंडळांनी मंगळवारी गणेशमूर्ती मिरवणुकीने आणल्या. प्राणप्रतिष्ठापनेनंतर पूजा, आरतीसाठी भाविकांनी गर्दी केली होती.

गणपतीपुळे येथे माघी गणेशोत्सवानिमित्त पहाटेपासूनच मंदिरामध्ये दर्शनासाठी गर्दी झाली होती. माघी गणेशोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. स्थानिक व जिल्ह्याबाहेरील भाविक दर्शनासाठी उपस्थित होते. यात्रा असल्याने विविध प्रकारच्या दुकानांची गर्दी झाली होती.