Home गुन्हा गणपती विसर्जन मिरवणुकीमध्ये गर्दीचा फायदा घेऊन मोबाईल चोरी करणारी टोळी पुणे ; गुन्हे शाखा युनिट २ ने केले जेरबंद

गणपती विसर्जन मिरवणुकीमध्ये गर्दीचा फायदा घेऊन मोबाईल चोरी करणारी टोळी पुणे ; गुन्हे शाखा युनिट २ ने केले जेरबंद

0

पुणे : परवेज शेख


गणपती विसर्जन मिरवणुकीत गर्दीचा फायदा घेऊन मोबाईल चोरणारी टोळी गुन्हे शाखा युनिट-२ च्या पथकाने जेरबंद केली.
मिळालेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखेचे अप्पर पोलिस आयुक्त अशोक मोराळे, पोलिस उपायुक्त बच्चन सिंह व सहायक पोलिस आयुक्त डॉ. शिवाजी पवार यांनी मोबाईल व दागिने चोरी होणार नाही याबाबत खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. गणेश विसर्जन मिरवणुक दरम्यान गुन्हे शाखा, युनिट-२ चे पोलिस निरीक्षक गजानन पवार व पथक पेट्रोलिंग करत असताना ढेंगळे पुलाच्या खाली नदीपात्राच चार इसम संशयित अवस्थेत आढळले. त्याना ताब्यात घेऊन चौकशी केली असता ते मालेगाव व नांदेड येथून गणपती पहाण्यास आल्याचे त्यांनी सांगितले. त्यांची अंगझडती व सॅकची झडती घेतली असता त्यांच्याकडे १८ मोबाईल सापडले. याबद्दल विचारणा केली असता त्याबद्दल विचारले असता त्यांनी काही समाधानकारक माहिती दिली नाही. त्यामुळे त्याना ताब्यात घेऊन कसून तपासणी केली असता त्यांनी शिवाजी रोड येथे विसर्जन मिरवणुक पहाण्यासाठी आलेल्या भक्तांचे चोरले असल्याचे त्यांनी कबूल केले. तसेच त्यांचे १४-१५ सहकारी मोबाईल चोरण्यासाठी वेगवेगळ्या ग्रुपने वेगवेगळ्या भागात मोबाईल चोरल्याचेही त्यांनी सांगितले. आरोपींनी सांगितल्याप्रमाणे पुणे रेल्वे स्टेशन दर्गा, मालधक्का जवळील रेल्वे इस्पितळ, संगमवाडीकडे जाणारे रेल्वे पुलाकडील व ठुबे पार्क, शिवाजीनगर येथून १५ साथीदाराना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून ७४ वेगवेगळ्या कंपनीचे मोबाईल हस्तगत केले आहेत. सदर आरोपी पुण्यात खाजगी वाहनाने आल्याचे त्यांनी सांगितले आहे. यात एकूण १९ आरोपीना ताब्यात घेऊन त्यांनी गणेशभक्तांकडून चोरलेले विविध कंपन्यांचे ७,१९,०००/- रूपयांचे एकूण ८२ मोबाईल हस्तगत केले आहेत. आरोपींच्या अंगझडतीत सदर मोबाईल हस्तगत झाले असून फरासखाना पोलिस ठाण्याच्या हद्दीत ५ मोबाईल चोरी केल्याचे गुन्हेही यात उघडकीस आले आहेत.
सदर कामगिरी गुन्हेचे अप्पर पोलिस आयुक्त अशोक मोराळे, उपायुक्त बच्चन सिंह, सहाय्यक पोलिस आयुक्त शिवाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट-२ चे पोलिस निरीक्षक गजानन पवार, सहाय्यक फौजदार यशवंत आंब्रे, संजय दळवी, अनिल ऊसुलकर, हवालदार दिनेश गडांकुश, अस्लम पठाण, पोलिस नाईक अतुल गायकवाड, विशाल भिलारे, शिपाई कदिर शेख, मितेश चोरमोले, गोपाळ मदने यांच्या पथकाने केली आहे.