गणेशोत्सवापूर्वी नागरिकांना चिपी विमानतळावरुन प्रवासाची सुविधा उपलब्ध करुन देणार – सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण

गणेशोत्सवापूर्वी नागरिकांना चिपी विमानतळावरुन प्रवासाची सुविधा उपलब्ध करुन देणार – सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण
- Advertisement -

मुंबईदि. 1 : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळावरुन सध्या सुरु असलेली विमान प्रवासाची  सुविधा नियमितसुरळीतपणे आणि अधिक फेऱ्यांच्या स्वरुपात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना उपलब्ध करुन देणार असून त्यासाठी आवश्यक तो पाठपुरावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात केंद्र सरकारकडे करण्यात येईलअशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी आज मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

            मंत्री श्री. चव्हाण म्हणाले कीपर्यटन जिल्हा म्हणून महत्वपूर्ण असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रोजगार वृद्धी तसेच स्थानिकांच्या प्रवासाच्या सोयीच्या दृष्टीने चिपी विमानतळावरील विमान प्रवास सेवा ही निश्चितच महत्वाची आहे. विशेषतः गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात येणारे चाकरमानीपर्यटकांच्या सोयीच्या दृष्टीने देखील ही सेवा अधिक उपलब्ध असणे आवश्यक आहे. विमान प्रवासाची सेवा सुरळीत होण्यासाठी अधिकाऱ्यांच्या अडचणी समजून घेत त्या सोडवण्यासाठी बैठक घेण्यात आली आहे. याबाबत धोरणात्मक निर्णय घेण्याची शासनाची भूमिका आहेसिंधुदुर्ग जिल्ह्याच्या रोजगार संधी विस्तारण्यासोबतच स्थानिक प्रवाशांच्या सोयीच्या दृष्टीने चिपी विमानतळावरुन पुरेशा प्रमाणात विमान प्रवास सेवा  सुरु करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईलअसे मंत्री श्री.चव्हाण यांनी यावेळी सांगितले.

0000

वंदना थोरात/विसंअ

- Advertisement -