Home गुन्हा गणेशोत्सव व विसर्जनात गर्दीचा फायदा घेऊन मोबाईल चोरणारे टोळ्यांना फरासखाना तपास पथकाकडून अटक

गणेशोत्सव व विसर्जनात गर्दीचा फायदा घेऊन मोबाईल चोरणारे टोळ्यांना फरासखाना तपास पथकाकडून अटक

0

पुणे : परवेज शेख


गणेशोत्सव दरम्यान व विसर्जन मिरवणुकीत गर्दीचा फायदा घेऊन नागरिकांच्या खिशातील मोबाईल चोरणार्‍या टोळ्यांना फरासखाना पोलिसांनी जेरबंद केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गणेशोत्सव व गणपती विसर्जन मिरवणुक पाहण्यासाठी आलेल्या भाविकांच्या खिशातील मोबाईल चोरणार्‍या ६ टोळ्या अशा १४ आरोपीना पकडून त्यांच्याकडून ७ लाख ६२ हजार रूपयांचे ४ आयफोन असे एकूण ६० मोबाईल चोरी केल्याचे निष्पन्न झाले असून आरोपींकडून ते हस्तगत केले आहेत. यात टोळी क्र. एकमध्ये (१) प्रतिक लोखंडे (वय २१, रा वर्धा), (२) कुणाल काळे (वय २०, रा. वर्धा), (३) किशोर सोळुंके (वय, ३५ रा. वाशिम), टोळी क्र. दोनमध्ये (१) भुषण देवतारे (वय २९, रा. वर्धा), (२) दिक्षित मिलिंद भगत उर्फ गुटली (वय २०, रा वर्धा.), टोळी क्र. तीनमध्ये (१) किरण आंग्रे (वय, २७, रा मुंबई.), तुकाराम शिंदे (वय ३०, रा मुंबई.), नितेश घुगरे (वय ३०, रा. मुंबई), टोळी क्र. चारमध्ये (१) विजय लोंढे (रा. शिवाजीनगर), (२) शहीद अन्सारी (रा. कोंढवा, पुणे), टोळी क्र पाचमध्ये (१) अब्दुल रफााक अब्दुल हमीद खान (रा. मुंबई), अबु बकर शेख (रा. मुंबई), टोळी क्र. सहामध्ये (१) सुरेश काळे (रा. नगर), महम्मद उस्मान (रा. नाशिक) याना अटक करून फरासखाना पोलिस स्टेशनकडील एकूण सहा गुन्हे उघडकीस आणले आहेत.


सदर कारवाई पश्‍चिम प्रादेशिक विभागचे अप्पर पोलिस आयुक्त श्रीकांत तरवडे, परिमंडळ-१ च्या पोलिस उपायुक्त श्रीमती स्वप्ना गोरे, फरासखाना विभागचे सहाय्यक पोलिस आयुक्त प्रदीप आफळे यांच्या मार्गदर्शनाखाली फरासखान्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जगन्नाथ कळसकर, गुन्हेचे पोलिस निरीक्षक नंदकिशोर शेळके, तपास पथकाचे प्रभारी अधिकारी पोलिस उपनिरीक्षक यशपाल सुर्यवंशी, हवालदार बापु खुटवड, सयाजी चव्हाण, केदार आढाव, पोलिस नाईक अमर शिंदे विशाल चौगुले, दिनेश भांदुर्गे, सचिन कुटे, सचिन सरपाले, मोहन दळवी, आकाश वाल्मिकी, अमेय रसाळ, मयुर भोकरे, पंकज देशमुख, राजु देशमुख, अनिल गायकवाड यांनी केली आहे.