Home शहरे मुंबई गर्दीची माहिती आता मोबाइलवर

गर्दीची माहिती आता मोबाइलवर

0
गर्दीची माहिती आता मोबाइलवर

[ad_1]

म. टा. प्रतिनिधी, मुंबई

मुंबई मेट्रो वन स्थानकांसह आता धावत्या मेट्रोमधील गर्दीची माहिती ही एका क्लिकवर प्रवाशांना दिसणार आहे. महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने मुंबई मेट्रो वन प्रशासनाने संकेतस्थळ (वेबसाइट) अद्ययावत केले आहे. या संकेतस्थळावरून २४ तास रिचार्जची सुविधाही प्रवाशांसाठी उपलब्ध करण्यात आली आहे.

घाटकोपर-अंधेरी-वर्सोवा मार्गावर धावणाऱ्या मेट्रोवनमुळे मुंबईकरांना वातानुकूलित वेगवान प्रवास शक्य झाला आहे. मुंबई मेट्रो वनच्या संकेतस्थळामध्ये ‘लाइव्ह ट्रॅफिक अपडेट’ सुरू करण्यात आले आहे. ट्रॅफिक अपडेटमध्ये स्थानकातील फलाटावर किंवा मेट्रोमध्ये प्रत्यक्ष उपस्थित न राहता गर्दीचे प्रमाण समजण्यास मदत होईल.

प्रवाशांना गर्दीचे प्रमाण सहजपणे लक्षात यावे, यासाठी लाल, हिरवा आणि पिवळ्या या रंगाचा वापर करण्यात आला आहे. ज्या स्थानकातून प्रवास करायचा आहे त्या स्थानकातील फलाटावर नेमकी किती गर्दी आहे, हे रंगाच्या माध्यमातून स्पष्ट होईल. अतिदाट गर्दीसाठी लाल, मध्यम गर्दीसाठी पिवळा आणि कमी गर्दीकरीता हिरवा रंग वापरण्यात आला आहे. याच पद्धतीने मेट्रो गाड्यामधील गर्दीचा आढावा देखील मुंबईकरांना मेट्रो स्थानकात न पोहोचता घेता येईल, अशी माहिती मेट्रो वन प्रवक्त्यांनी दिली.

करोना काळातील अधिक कडक निर्बंध आता १५ मेपर्यंत कायम राहणार आहेत. सध्या अत्यावश्यक सेवेतील प्रवाशांनाच प्रवासाची मुभा असली तरी भविष्यात मेट्रो स्थानकातील गर्दी नियोजनासाठी मेट्रो वनचे हे उपाय आहेत.

रिचार्जची सोय

मेट्रो स्मार्ट कार्ड आता डेबिट-क्रेडिट कार्ड, भीम, गुगल पे, पेटीएम आणि अन्य पर्यायांमधून देखील रिचार्ज करणे शक्य होणार आहे. ही सुविधा प्रवाशांना २४ तास वापरता येईल. यापूर्वी केवळ अमेझॉन पे यावरून रिचार्जचा पर्याय होता.

प्रवाशांना फायदा

मुंबई बाहेरील प्रवाशांसाठी किंवा पहिल्यांदा मेट्रोने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या माहितीसाठी स्थानकाची माहिती संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आली आहे. गेट क्रमांक, स्थानकातील सुविधा, प्रवास दिशा याचा समावेश माहितीमध्ये असल्याने प्रवाशांना याचा नक्कीच फायदा होईल, असा विश्वास मेट्रो वन प्रशासनाने व्यक्त केला आहे.

सवलतीची सुविधा

‘मेट्रो रिवार्ड’ ही सुविधा सुरू करण्यात आली असून मेट्रो प्रवासानुसार हे पॉईंटस असतील. या पॉईंटवर चित्रपटगृह, हॉटेल तसेच अन्य ठिकाणी प्रवाशांना सवलत मिळेल.

[ad_2]

Source link