Home बातम्या आंतरराष्ट्रीय गर्भवती महिलेला लागली गोळी,बाळाचा मृत्यू झाल्याने आईविरोधातच खटला

गर्भवती महिलेला लागली गोळी,बाळाचा मृत्यू झाल्याने आईविरोधातच खटला

वॉशिंग्टन (अमेरिका) : एका गर्भवती महिलेचं दुसऱ्या एका महिलेशी भांडण झालं. तिच्या पोटात वाढत असलेल्या बाळाचा गोळी लागून मृत्यू ओढवला. पण या सगळ्या घटनेसाठी या महिलेला जबाबदार ठरवून तिच्याविरुद्ध खटला चालवण्याचे आदेश देण्यात आले.या घटनेमुळे अमेरिकेत खळबळ माजली आहे.

अमेरिकेमधल्या वॉशिंग्टनमध्ये ही घटना घडली. या महिलेने 50 हजार रुपयांचा जामीन भरल्यानंतरच तिला सोडून देण्यात आलं. पण या प्रकरणी तिला दोषी ठरवल्यामुळे अमेरिकेत निषेध व्यक्त करण्यात येत आहे.

मार्शे जोन्स ही महिला पाच महिन्यांची गर्भवती होती. तिचं एका महिलेशी भांडण झालं. हे प्रकरण मुद्द्यावरून गुद्द्यावर गेलं. त्या महिलेनं गोळी झाडली. ही गोळी लागून मार्शेच्या पोटातल्या बाळाचा मृत्यू ओढवला. पण याची शिक्षा तिला देण्यात आली

तपास अधिकारी लेफ्टनंट डेनी रीड यांच्या सांगण्यानुसार, या भांडणाची सुरुवात मार्शे जोन्स हिनेच केली होती. त्यामुळे झाल्या प्रकाराला तीच जबाबदार आहे. ती तिच्या बाळाला वाचवण्यात असमर्थ ठरली, असंही त्यांचं म्हणणं होतं.

अमेरिकेमध्ये सध्या गर्भवती महिलांच्या समस्या आणि त्यांच्या पोटात वाढणाऱ्या गर्भाचे अधिकार याबद्दल चर्चा आणि वादविवाद सुरू आहेत. त्याचवेळी मार्शे जोन्सचं हे प्रकरण समोर आलं आहे.

मार्शे जोन्स ही कृष्णवर्णीय असल्यामुळे या सगळ्या प्रकाराला वर्णभेदाचं वळणही लागलं आहे. मार्शेच्या अटकेविरोधात गर्भपाताचं समर्थन करणारे एकत्र आले आहेत. मार्शे जोन्सला या प्रकरणी दोषी ठरवण्याच्या निर्णयाचा त्यांनी निषेध केला आहे. मार्शेला दोषी ठरवणं हा वर्णभेदाचाच प्रकार आहे, असं त्यांचं म्हणणं आहे.

पुण्यातली भिंत पडली तेव्हा काय घडलं प्रत्यक्ष? CCTV फुटेज आलं समोर