हायलाइट्स:
- ख्रिस्टियानो रोनाल्डोने मोडला करोना व्हायरस संदर्भातील नियम
- गर्लफ्रेंडच्या वाढदिवसासाठी केली होती पार्टी
- सोशल मीडियावरील पोस्टमुळे समोर आली गोष्ट
- इटली पोलिसांकडून चौकशी सुरू
गोल डॉट कॉमने दिलेल्या वृत्तानुसार रोनाल्डोची गर्लफ्रेंड जॉर्जिना रोड्रिगेजने या आठवड्यात इटलीतील एका डोंगराळ भागातील रिसॉटमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. त्यानंतर वेले डीओस्टा पोलिसांनी चौकशी सुरू केली. या फोटोत रोनाल्डो देखील दिसत आहे.
वाचा- ICCने केले पाक क्रिकेटपटूला ट्रोल; भारतीयांनी संधी सोडी नाही
इटलीतील नियमानुसार ऑरेंज झोनमध्ये प्रवास करण्यास परवानगी नाही. पण रोनाल्डोने गर्लफ्रेंडच्या २७व्या वाढदिवसासाठी नियम मोडल्याचा आरोप करण्यात आला आहे. जर हे आरोप खरे ठरले तर दोघांना मोठा दंड बसू शकतो.
वाचा- तेव्हा लोकल रेल्वेत कोणी ओळखले नव्हते; आता टीम इंडियाचा स्टार झालाय हा खेळाडू
या संदर्भात चौकशी करण्यासाठी गुरुवारी पोलिस संबंधित हॉटेलमध्ये पोहोचले होते. पण रोनाल्डो तेथे भेटला नाही. तो सध्या इटलीतील पीडमोंट या परिसरात राहतो. करोनाच्या नियमानुसार अपवादात्मक परिस्थिती असेल तरच अन्य ठिकाणी प्रवास करता येतो. पण सोशल मीडियावरील पोस्टमधून त्याने हा नियम मोडल्याचे दिसते. या प्रकरणी पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे.
वाचा- IPL 2021: लिलावासाठी अर्जुन तेंडुलकर पात्र; या संघात मिळू शकते सचिनच्या मुलाला स्थान
युवेंट्सने रोनाल्डो आणि पाउलो डायबाला सारख्या दिग्गज खेळाडूंशिवाय इटालियन कप फुटबॉलच्या सेमीफायनलमध्ये प्रवेश केला. त्यांनी स्पालचा ४-०ने पराभव केला. युवेंट्सची नजर १४व्या विजेतेपदावर आहे. गेल्या वर्षी अंतिम सामन्यात त्यांचा नपोलीकडून पराभव झाला होता.