Home गुन्हा गांजाची विक्री करताना एकाला अटक, मुख्य आरोपी फरार

गांजाची विक्री करताना एकाला अटक, मुख्य आरोपी फरार

0

ठाणे:मध्यवर्ती पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एक किलो पेक्षा जास्त गांजा मध्यवर्ती पोलिसांनी पकडला आहे. यातील मुख्य आरोपी मात्र फरार झाला आहे. मध्यवर्ती पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोपाळ समाज शास्त्री नगर परिसरात गांजा विकत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या अनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर सुरडकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरणच्या टीमने या परिसरात सापळा रचून आरोपी असमुद्दीन शेख याला ताब्यात घेतले. यावेळी त्याच्याकडून तब्बल एक किलो पेक्षा जास्त गांजा ताब्यात घेतला आहे. यातील मुख्य आरोपी शहीद शेख फरार झाला असून त्याचा शोध पोलीस घेत आहेत. या कारवाईमुळे गोपाळ समाज आणि शास्त्री नगर परिसरात असे अनेक अंमली पदार्थ विक्री करण्याचे धंदे असून त्यावरही कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.