परवेज शेख पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पेट्रोलिंग दरम्यान पोलिसांना राहुल टॉकिजजवळ फुटपाथवर एक इसम गांजा विक्री करीत असल्याची माहिती मिळाली. त्याआधारे पोलिसांनी सापळा लावून आरोपी शौकत याला अटक केली. त्याच्याकडून 200 ग्रॅम गांजा हस्तगत करण्यात आला. तेलंगणा येथून त्याने हा गांजा आणल्याची माहिती प्राथमिक तपासात समोर आली आहे.शौकत हा सराईत गुन्हेगार असून यापूर्वीही त्याच्यावर गांजा विक्री व अन्य गुन्हे दाखल आहेत. युनिट चारच्या पोलिसांनी त्याला पकडून शिवाजीनगर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. त्याची आणखी चौकशी सुरू असून शिवजीनगर पोलीस पुढील तपास करीत आहे.

- Advertisement -