महाराष्ट्र सेवा संघ मुलुंड यांच्यातर्फे गानसरस्वती किशोरी आमोणकर यांच्या आलाप-प्रधान गायकीचे वैशिष्ट उलगडणारी महफिल आणि संवादाचा कार्यक्रम आलाप वार्तालाप हा विदुषी नंदिनी बेडेकर सादर करणार आहेत. त्याना हार्मोनियमवर साथ श्रेयस गोवित्रीकर तर तबलावर साथ विराज आचार्य करणार आहेत. सूत्रसंचालन अनन्या गोवित्रीकर करणार आहेत. कार्यक्रम रविवार २३ जून रोजी सकाळी ९ वाजता कै. सुविधा गोविंद गोखले सभागृह, महाराष्ट्र सेवा संघ हॉल, मुलुंड पूर्व येथे होणार असून हा कार्यक्रम रसिकांसाठी मोफत आहे.