हायलाइट्स:
- गायक अरिजीत सिंगची आई हॉस्पिटलमध्ये
- ए निगेटिव्ह रक्तदात्याची गरज
- अभिनेत्री स्वस्तिका मुखर्जीने सोशल मीडियावर दिली माहिती
अभिनेत्री स्वस्तिका मुखर्जीने गुरुवारी सकाळी १० वाजता ट्वीट केले. त्या ट्वीटमध्ये स्वस्तिकाने लिहिले की, ‘गायक अरिजीत सिंगच्या आईची तब्येत बिघडल्याने त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांना कोलकाता येथील ढाकुरिया हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांना ए निगेटिव्ह रक्ताची गरज आहे. तसेच हे रक्त पुरुषाचेच हवे आहे.’
हिच माहिती स्वस्तिकाने इन्स्टाग्रामवरदेखील शेअर केली आहे. स्वस्तिकाच्या या पोस्टवर अनेकांनी प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आहे. अद्याप अरिजीत सिंगच्या आईच्या तब्येतीची कोणतीही ताजी माहिती मिळालेली नाही. माहिती मिळाल्यानंतर तुम्हाला देण्यात येईल.