Home शहरे जळगाव गाय दूध खरेदी दरात दोन रुपयांची वाढ

गाय दूध खरेदी दरात दोन रुपयांची वाढ

0

जळगाव/दापोरा : अतिवृष्टीमुळे खराब झलेला चारा, बाजारातील सरकी ढेप व पशुखाद्याचे वाढलेले भाव लक्षात घेऊन दूध उत्पादकांचे नुकसान लक्षात घेता जळगावदूध संघाने गाय दूध खरेदी दरात वाढ करून ते २७ रुपयांवरून २९ रुपये प्रतिलिटर याप्रमाणे करण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवार ११ नोव्हेंबरपासून हे नवे दर लागू
होतील.
सर्व संस्थांनी व दूध उत्पादकांनी दुधाचा पुरवठा संघास करावा. अतिवृष्टीमुळे बुरशीयुक्त काळा झालेला चारा जनावरांना खावू घालणे शक्यतो टाळावे किंवा हा चारा उन्हत ३-४ दिवस वाळून त्यावर चुन्याची निवळी टाकावी व तसा प्रक्रिया केलेला चारा कमी प्रमाणात जनावरांना खाऊ घालावा.
हिरव्या चाऱ्याकरिता संघामार्फत मका बियाणे दूध उत्पादकांना उपलब्ध करून देण्यात आले आहे.
तसेच संघामार्फत १०० टक्के अनुदानाने राबवण्यात येणारा जंतनिर्मूलन व लसीकरणारच्या कार्यक्रमाचा दूध उत्पादकांनी संस्थेच्या माध्यमातून लाभ घ्यावा, असे आवाहन जळगाव दूध संघाच्या अध्यक्षा मंदाकिनी खडसे यांच्यावतीने करण्यात आले आहे.

नवीन दर होणार लागू : म्हैस दूध खरेदी पूर्वीप्रमाणेच
-जिल्हा दूध संघाकडून नवीन गाय दूध खरेदी दर हे ११ तारखेपासून २४१.७० प्रती किलो घनघटक प्रमाणे लागू होणार आहेत. त्यात ३.२ फॅट व ८.५ एसएनएफ साठी २८.१० रु तर ५.५ फॅट व ८.५ एसएनएफ ला ३३.६०रु भाव मिळेल ९ एसएनएफ पर्यन्त प्रती एसएनएफ १० पैसे अधिकचा दर दिला जाणार आहे. निकृष्ट चारा व सततचा पाऊस यामुळे दुधातील गुणवत्ता कमी झाल्याने एसएनएफ कमी लागून शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे यामुळे ८.१ एसएनएफ साठी देखील उत्तम प्रतीचा दर दिला जाणार आहे.
_-जिल्हा दूध संघाकडून म्हैस दूध खरेदी दरात कोणतीही वाढ न करता पूर्वीप्रमाणेच ६.१० रु प्रती फॅट प्रमाणे आहेत मात्र या भाव वाढीने गाय दूध उत्पाद्कांना दिलासा मिळाला असला तरी म्हैस दूध खरेदी दर देखील वाढणे अपेक्षित होते.