Home अश्रेणीबद्ध गावठी पिस्तूल विकण्यासाठी आलेल्या इसमाला पोलिसांनी केली अटक

गावठी पिस्तूल विकण्यासाठी आलेल्या इसमाला पोलिसांनी केली अटक

0

गावठीपिस्तूलविकण्यासाठीआलेल्याइसमालापोलिसांनीकेली_अटक…

मुंबई : शफीक शेख ठाणे :- विधानसभेच्या २०१९ च्या निवडणुकीची आचारसंहिता सुरु आहे, पोलिसांनी आपला बंदोबस्त वाढवला आहे, निवडणुकीच्या धामधुमीत काही अघटित घडू नये म्हणून अवैध्य हत्यारे, गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या इसमांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे आदेश वरिष्ठ पातळीवरून पोलिसांना मिळाले आहेत, त्या अनुषंगाने तपास सुरु असताना गुन्हे शाखा वागळे युनिट -५ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराज रणवरे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहीती मिळाली की १/१०/२०१९ रोजी नितीन नाका ठाणे येथे एक इसम गावठी पिस्तूल विकण्यासाठी येणार आहे, ह्या माहितीची खातरजमा करून त्यांनी आपल्या अधिकाऱ्यांना त्या इसमास ताब्यात घेण्याच्या सूचना दिल्या.

                मिळालेल्या माहिती प्रमाणे पोलिसांनी सापळा रचला असता नितीन नाका येथून कॅडबरी कडे जाणाऱ्या रोडवर एक इसम संशयित रित्या दिसला त्याला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता त्याच्या कडे दोन गावठी पिस्तूल, दोन काळ्या रंगाच्या रिकाम्या मॅगझीन, तसेच चार जिवंतकाडतुस मिळाले त्या इसमाने आपले   नाव विशाल ध्रुवनारायण सिंह असून तो राहण्यास घोडबंदर रोड  येथे असल्याचे सांगितले, त्याच्यावर ३७ (१) १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याने ही गावठी पिस्तूल कुठून आली याची चौकशी सुरु आहे.

ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराज रणवरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण शिंदे, अनिल सुरवसे, प्रशांत पवार, सहाय्यक पोलीस उप निरीक्षक बाबू चव्हाण, पोलीस हवालदार विकास लोहार, जगदीश न्हाळवदे, अजय फराटे, देविदास जाधव, विजयकुमार गोऱ्हे, मनोज पवार,राजकुमार पाटील, राजेश क्षत्रिय, शिवाजी रायसिंग, दिलीप शिंदे, शशिकांत नागपुरे, संजय सोंडकर, पोलीस नाईक राजेंद्र गायकवाड, अजित शिंदे, सागर सुळस्कर, कल्पना तावरे, सुजाता वाकचौरे, या पथकाने केली.