Home ताज्या बातम्या गावठी हातभट्टी दारू तयार करणाऱ्या ठिकाणी बारामती पोलिसांनी केली कारवाई

गावठी हातभट्टी दारू तयार करणाऱ्या ठिकाणी बारामती पोलिसांनी केली कारवाई

0

पुणे : परवेज शेख 12 ऑक्टोबर रोजी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने यवत येथे गावठी हातभट्टी दारू तयार करणाऱ्या ठिकाणी छापा 2,10,000 रु चे गावठी हातभट्टी तयार करण्यासाठीचे कच्चे रसायन, साधने व 3,000 रु ची 60 लिटर तयार दारू सह एकूण(2,24,000 रु) चा माल जप्त..


बारामतीचे मा. जयंत मीना(भा पो से), अपर पोलीस अधीक्षक सो बारामती यांना यवत येथे मोठया प्रमाणात अवैध रित्या गावठी हातभट्टी दारू तयार करून त्याची विक्री करीत असले बाबत गोपनिय माहिती मिळाली असता त्यांनी बारामती क्राईम ब्रँच चे पोलीस निरीक्षक श्री चंद्रशेखर यादव आणि श्री भाऊसाहेब पाटील,

पो नि यवत पो स्टे यांना सांगून सदर ठिकाणी रेड करणेस सांगितले. त्या प्रमाणे यवत येथील नांदूर, पारगाव या ठिकाणी अचानक छापा मारला असता सदर ठिकाणी खालील नमूद इसम हे खालील नमूद साहित्यांचा वापर करून गावठी हटभट्टीची दारू तयार करून विक्री करत असताना मिळून आले. सदर ठिकाणी खालील वर्णनाचा माळ मिळून आला आहे.लैला गुडदावत रा नांदूर ता दौंड
2) अंजु राव नानावत रा भांडगाव दौंड फरार आहे.

सदरची कामगिरी ही, मा.संदिप पाटील सो पोलीस अधीक्षक, पुणे (ग्रा) मा.जयंत मीना सो अप्पर पोलीस अधीक्षक, बारामती(IPS) मा.ऐश्वर्य शर्मा सो उपविभागीय पोलीस अधिकारी दौंड(IPS) यांचे मार्गदर्शनाखाली बारामती क्राईम ब्रँच पथकाचे चंद्रशेखर यादव पोलीस निरीक्षक, पो.हवा. संदिप जाधव, सुरेंद्र वाघ, पो.ना. स्वप्नील अहिवळे पो.कॉ. दशरथ कोळेकर पो.कॉ. विशाल जावळे पो.कॉ. शर्मा पवार आणि श्री. भाऊसाहेब पाटील पोलीस निरीक्षक, पो.ना.संपत खबाले पो.कॉ.उत्तप्पा संकुल, यवत पोलीस स्टेशन आणि जलद कृती दलाचे 5 जवान यांनी केली.