गुंजवणी धरणावरील सुरक्षारक्षकाचा खून
गुंजवणी धरणावरील सुरक्षारक्षकाची धारधार हत्याराने वार करून खून केल्याची घटना समोर आली आहे. खुनाचे कारणही अद्याप समजू शकले नाही. अविनाश शांताराम लेकावळे (वय 29, रा. मोहरी, ता. भोर) असे खून झालेल्या सुरक्षा रक्षकाचे नाव आहे. या प्रकरणी शांताराम लेकावळे यांनी राजगड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
बुधवारी (दि. 28) रात्री पावणेदहाच्या सुमारास हातवे खुर्द (ता. भोर) गावच्या हद्दीत तांभाडकडे जाणाऱ्या रस्त्यावर बेंदची विहीर येथे ही घटना घडली आहे. लेकावळे हे गुंजवणी धरणावर सुरक्षा रक्षक होते. रात्री कामाला दुचाकीवरून (एमएच 12, डीएफ 2775) जात असताना अज्ञात आरोपीने त्यांच्या डोक्यात धारधार हत्याराने वार केले. यामुळे रक्तस्त्राव झाल्याने अविनाश यांचा जागीच मृत्यू झाला. गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी राजगड पोलिसांनी माहिती देणाऱ्यास बक्षीस देण्याचे जाहीर केले आहे.