Home ताज्या बातम्या गुंडाकडून हत्यारांचा धाक दाखवत परप्रांतीय व्यापाऱ्यांवर दहशत माजवत केले वार; दोन व्यापारी व स्थानिक युवक जखमी

गुंडाकडून हत्यारांचा धाक दाखवत परप्रांतीय व्यापाऱ्यांवर दहशत माजवत केले वार; दोन व्यापारी व स्थानिक युवक जखमी

0

गुंडाकडून हत्यारांचा धाक दाखवत परप्रांतीय व्यापाऱ्यांवर दहशत माजवत केले वार; दोन व्यापारी व स्थानिक युवक जखमी
पुणे : बिबवेवाडी गावठाण,पापळवस्तीमध्ये चार-पाचजणांच्या टोळक्याने हत्यारांचा धाक दाखवत दहशत माजवत दुकानांची तोडफोड करत राजस्थानी व्यापारी टिकाराम चौधरी, तोळालाल पटेल व स्थानिक युवक अविनाश पवार यांच्यावर वार करून जखमी केले. स्थानिक नागरिक या प्रकारामुळे भयभीत झाले असून दहशतीखाली आहेत. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच बिबवेवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार घाडगे यांनी घटनास्थळी वस्तीला भेट देत घडलेल्या घटनेची महिती घेत तपास सुरू केला.

मिळालेल्या माहितीनुसार,
शुक्रवार दिनांक २० सप्टेंबर २०१९ रोजी रात्री ७.४५ ते ८.३० वा. सुमारास बिबवेवाडी गावठाणजवळील पापळवस्तीमध्ये काही स्थानिक गुंडांच्या समवेत आलेल्या चार ते पाच जणांच्या टोळक्याने हातात कोयता व तलवारी घेऊन वस्तीमधील चार राजस्थानी दुकानदारांना पैशाची मागणी करीत दुकानाचे व दुकानातील साहित्याचे नुकसान केले. व्यापाऱ्यांनी प्रतिकार केला म्हणून कोयत्याने वार केले. यांना हटकणाऱ्या स्थानिक युवकास दमदाटी करीत तलवारीने वार केला, पण सुदैवाने युवक वाचला व त्याचे हातास जखम झाली. गुंडांच्या दहशतीमुळे स्थानिक नागरिक सुद्धा घाबरले. परिसरातील नागरिक एकत्र येत या घटनेचा निषेध करण्यात आला. बिबवेवाडी पोलिसांनी फिर्यादीची तक्रार न घेता आधी तुम्ही ससूनला जाऊन मेडिकल करून या नंतर बघू, असे सांगत चौकीतील पोलिसांनी तक्रारदारांना टाळले, असे व्यापारी व जखमी युवक यांनी सांगितले. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच बिबवेवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार घाडगे यांनी घटनास्थळी वस्तीला भेट देत घडलेल्या घटनेची महिती घेत तपास सुरू केला. स्थानिक नगरसेविका मानसी देशपांडे यांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी याभागातील नागरिकांना हिम्मत देत याविषयी पोलीस बंदोबस्त व सी.सी.टीव्ही कॅमेरे लावण्या बद्दल स्थानिक नागरिक व पोलिसांची चर्चा केली.

नागरिकांच्या प्रतिक्रिया

याभागात स्थानिक व बाहेरील गुंडांची मोठी दहशत आहे. या गुंडांकडून दारू पिऊन धिंगाणा घातला जातो. बिबवेवाडी पोलिसांना तक्रारी देऊन सुद्धा कारवाई होत नाही. त्यामुळे वस्तीतील नागरिकांना त्यांची दादागिरी सहन करावी लागते, असे विकास कुटे यांनी सांगितले.

याभागात सी.सी.टिव्ही कॅमेरे लावले पाहिजेत. पोलिसांची गस्त दिवसा व रात्री झाली पाहिजे, त्यामुळे किमान व्यापारी व स्थानिक नागरिकांचे दहशतीचे भय कमी होईल, असे कैलास बिबवे(अध्यक्ष स्थानिक व्यापारी आघाडी) यांनी सांगितले.

पोलिसांनी नागरिकांच्या सुरक्षेसाठी या गुंडावर कायमस्वरूपी कारवाई करून वस्तीत गस्त वाढवली पाहिजेत, असे स्थानिक नगरसेविका मानसी देशपांडे यांनी सांगितले.