Home ताज्या बातम्या गुगलच्या कर्मचाऱ्यांना 75,000 करोना भत्ता

गुगलच्या कर्मचाऱ्यांना 75,000 करोना भत्ता

नवी दिल्ली : करोनाच्या साथीमुळे वर्क फ्रॉम होम ही आता सर्वमान्य संकल्पना झाली आहे. मात्र आपल्या कर्मचाऱ्यांना एक हजार अमेरिकन डॉलर्स (सुमारे 75 हजार रुपये) दिले आहेत. हे पैसे कर्मचाऱ्यांना घरातून काम करणे सोयीचे होण्यासाठी फर्निचर खरेदीसाठी वापरायचे आहेत.

तुम्ही लॅपटॉप घ्या अथवा आरामदायी खुर्ची किंवा टेवल घ्या असे कंपनीने त्यांना सांगितले आहे. साधारण पुढील वर्षभर गुगलच्या कर्मचाऱ्यांना घरातून काम करावे लागेल, असे दिसते. त्यमुळेच आम्ही सर्व कर्मचाऱ्यांना आवश्‍यक खरेदीसाठी एक हजार अमेरिकन डॉलर्स किंवा त्यांच्या देशातील सममुल्य रक्कम देत आहोत, असे गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सूंदर पिचाई यांनी आपल्याइ मेलमध्ये म्हटले आहे.

कर्मचारी घरातून काम करत असताना त्यांच्यावरील ताण कमी व्हावा, या हेतूने हा भत्ता देण्यात आला आहे. त्यांना हवे ते हार्डवेअर ते त्यातून खरेदी करू शकतील. या द्वारे या कठीण काळात त्यांचे मनोधैर्य कायम राहील, असेही या इ-मेलमध्ये म्हटले आहे.

ज्यांना कार्यालयातून काम करण्याची इच्छा आहे त्यांचयसाठी कार्यालये सहा जुलैपासून खुली करण्यात येणार असल्याचे गुगलने स्पष्ट केले आहे.