Home बातम्या वैज्ञानिक गुगल क्रोम होणार अपग्रेड; ‘क्रोम ७६’ उद्या रिलीज

गुगल क्रोम होणार अपग्रेड; ‘क्रोम ७६’ उद्या रिलीज

नवी दिल्लीः  सर्च इंजिन, ई-मेल, ऑपरेटिंग सिस्टिम आदी विविध क्षेत्रात अग्रणी असलेलं गुगल आपले वेब ब्राउजर गुगल क्रोमअपग्रेड करणार आहे. ३० जुलैला गुगल क्रोम ७६ रिलीज होणार आहे. काही दिवसांपूर्वी युजर्सनी क्रोमच्या incognito modeमध्येही युजर्सचा डेटावर काही वेबसाइटद्वारे लक्ष ठेवण्यात येत असल्याच्या तक्रारी 

केल्या होत्या. या प्रकरणाची गंभीर दखल घेत गुगलनं क्रोम अपडेट केलं आहे. ‘गुगल क्रोम ७६’ या नव्या अपग्रेडमध्ये युजर्सच्या प्रायव्हसीची खबरदारी घेतली आहे. तसंच गुगल क्रोम अधिक सुरक्षित बनवण्यासाठी काही फिचर्स लाँच केले आहेत. 

फ्लॅश डिसेबल
गुगल क्रोमच्या सगळ्या वेबसाइटसाठी अॅडॉब फ्लॅशचा पर्याय असणार आहे. युजर्स हा पर्याय काढून टाकू शकत नाही. मात्र, फ्लॅशचा वापर फक्त ‘क्लिक टू प्ले मोड’मध्येच करता येणार आहे. त्याचबरोबर डिसेंबर २०२०नंतर क्रोम फ्लॅश प्लेअरला सपोर्ट करणार नसल्याचे नोटिफिकेशन क्रोमकडून युजर्सला देण्यात येतील. 

प्रायव्हसी राखणार
काही वेबसाइट्स फाइल सिस्टम एपीआय रिक्वेस्ट पाठवून युजर्सच्या इनकॉग्निटो मोडची तपासणी करत होते. तर काही वेबसाइट या ट्रिकचा वापर करून इनकॉग्निटी मोडचा वापर करणाऱ्या युजर्सना थेट ब्लॉक करत होत्या. गुगल क्रोमच्या अपडेटमुळं युजर्सची प्रायव्हसी राखली जाणार आहे. 

ऑटोमॅटिक डार्क मोड
क्रोम ७६ लाँच झाल्यानंतर युजर्सनी ऑपरेटिंग सिस्टमवर डार्क मोड सिलेक्ट केल्यानंतर वेबासाइटला कळू शकणार आहे. युजर्स डार्क मोडचा पर्याय निवडताच वेबसाइटकडून युजर्सना डार्क थीममध्ये माहिती दाखवण्यात येईल.