Home मनोरंजन गुजरातमध्ये पूजेसाठी एकत्र आल्या शेकडो महिला, प्रकाश राज म्हणतात- ‘गो करोना…’

गुजरातमध्ये पूजेसाठी एकत्र आल्या शेकडो महिला, प्रकाश राज म्हणतात- ‘गो करोना…’

0
गुजरातमध्ये पूजेसाठी एकत्र आल्या शेकडो महिला, प्रकाश राज म्हणतात- ‘गो करोना…’

[ad_1]

मुंबई: भारतात करोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेनं हाहाकार माजवला आहे. अनेकांचा यामध्ये मृत्यू झाला आहे. तर लाखो लोकांना करोनाचं संक्रमण झाल्यानं रुग्णालयांमध्ये बेड, ऑक्सिजन सिलेंडर, औषध यांचा तुटवडा भासत आहे. अशातच आता अनेक राज्यांमध्ये लॉकडाऊन आणि सोशल डिस्टन्सिंगचे नियम कडक करण्यात आलेले असताना सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. ज्यात अनेक महिला हे नियम पायदळी तुडवत करोना काळात पूजेसाठी एकत्र आलेल्या पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ गुजरात मधील असल्याच बोललं जात आहे. यावर अभिनेता प्रकाश राज यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेला महिलांचा हा व्हिडीओ गुजरातमधील असल्याचं बोललं जात आहे. मंगळवारी ४ मे रोजी अहमदाबादच्या साणंद जिल्ह्याच्या नयापुरा गावातील या महिला बालियादेव मंदिरात पूजेसाठी एकत्र आल्या होत्या. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी यावर प्रतिक्रिया दिल्या होत्या. अशात आता यावर अभिनेता प्रकाश राज यांनी केलेलं ट्वीट सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

प्रकाश राज यांनी या महिलांचा व्हिडीओ रिट्विट करताना लिहिलं, ‘गो करोना गो. आपण कधीच शिकणार नाही आहोत का? मी फक्त विचारत आहे.’ प्रकाश राज यांनी हा व्हिडीओ शेअर करताना यावर नाराजी व्यक्त केली आहे. प्रकाश राज यांनी शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, डोक्यावर पाण्याचा कलश घेऊन अनेक महिला पूजेसाठी जात आहेत.

दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी कारवाई केली आहे. अहमदाबाद ग्रामीण भागाचे डीएसपी के. टी. खेमरिया यांनी सांगितलं की, या प्रकरणी २३ लोकांवर कारवाई करण्यात आली आहे. ज्यात गावाच्या सरपंचांचाही समावेश आहे. गुजरातसह संपूर्ण देश करोनाशी लढत आहे. रुग्णसंख्या वाढत असल्यानं औषधं, बेड आणि ऑक्सिजनचा तुटवडा भासताना दिसत आहे. बॉलिवूडच्याही अनेक कलाकारांचं करोनाच्या दुसऱ्या लाटेत निधन झालं आहे. दरम्यान रणबीर कपूर, आलिया भट्ट, कैटरीना कैफ, विक्की कौशल, कार्तिक आर्यन या कलाकारांना करोनाची लागण झाली होती.

[ad_2]

Source link